Gautami Patil: कोल्हापूरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी, काय आहे कारण?
Gautami Patil: गौतमी पाटीलचा कोल्हापूरातील कार्यक्रम रद्द का झाला? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
मादक अदा आणि नृत्य शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारी म्हणजे गौतमी पाटील. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा राडा झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. आता गौतमीच्या कार्यक्रमावर कोल्हापूरात बंदी घालण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील करवीर आणि राधानगरी तालुक्यात गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कारण गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. गणेशोत्सवाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करु नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधिकारी महेंद्र पंडीत यांनी केले आहे.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर बाप्पाचे जल्लोषात स्वागत पाहा व्हिडीओ
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पाचे दणक्यात स्वागत सुरु आहे. चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. डीजे, ढोलताशाच्या गजरात तरुण मंडळींनी मिरवणूक काढत बाप्पाला विराजमान केले आहे. अनेक ठिकाणी जनजागृती करणारे देखावे, विविध समाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंडळींनी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कार्यक्रमाची परवानगी नाकारली.
विभाग