मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'बापाचा बाप येतोय', गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?

'बापाचा बाप येतोय', गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 26, 2024 04:12 PM IST

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलची एकापाठोपाठ एक गाणी येतच आहेत. नुकताच तिचे 'बापाचा बाप येतोय' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या नव्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'बापाचा बाप येतोय', गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?
'बापाचा बाप येतोय', गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का? (HT)

आपल्या सौंदर्याने आणि मादक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी लावणी सादर करत तिने तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. अनेक खेड्यापाड्यात गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. सध्या गौतमीच्या एका गाण्याची चर्चा रंगली आहे.

गौतमीचे 'बापाचा बाप येतोय' हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रीत पाटील ऑफिशल या यूट्यूब चॅनेलवर गौतमीचे हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या चॅनेलचे सब्सक्रायबर १ हजार आहेत. पण गौतमीच्या व्हिडीओला जवळपास ३४ हजार व्ह्यू आले आहेत. या गाण्यात गौतमीने पांढऱ्या रंगाची आणि गुलाबी बॉर्डर असणारी साडी नेसली आहे. नाकात नथ, केसात गजरा आणि न्यूड मेकअपमध्ये गौतमी अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

गौतमीचे 'बापाचा बाप येतोय' या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला गौतमी चॉपरमधून उतरताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या डान्सचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. चाहत्यांनी गौतमीच्या या डान्स व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातनं होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ

'बापाचा बाप येतोय' हे गाणे गायिका प्रीत पाटीलने गायले आहे. तर गाण्याला रोमियो कांबळेने संगीत दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन प्रकाश धिंडले यांनी केले आहे. गाण्यामधील गौतमीचा घायाळ करणारा अंदाजस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

गौतमीचे हे पहिलेच गाणे नाही. यापूर्वी तिचे "घोटाळा झाला", "माझा कारभार सोपा नसतोय रं", "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम", "पाटलांचा बैलगाडा", आणि "दिलाचं पाखरु" हे अल्बम प्रदर्शित झाले होते. तिच्या या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली. आता तिचे 'बापाचा बाप येतोय' हे गाणे चर्चेत आहे. गौतमीने रुपेरी पडद्यावर देखील काम केले आहे. तिचा 'घुंगरु' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील बाबा गायकवाडने केले होते. पण हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नाही.

IPL_Entry_Point

विभाग