मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 01:44 PM IST

Gautami Patil New Song: गौतमी आपल्या लावणीच्या अदांनी सगळ्यांना घायाळ करत आहे. आता ती गायन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Gautami Patil-Utkarsh Shinde
Gautami Patil-Utkarsh Shinde

Gautami Patil New Song: सध्या आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिने अनेक ठिकाणी लावणी सादर करत अक्षरश: वेड लावले आहे. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. एकीकडे गौतमी आपल्या लावणीच्या अदांनी सगळ्यांना घायाळ करत आहे. तर, दुसरीकडे आता ती गायन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा स्पर्धक-गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

डॉ. उत्कर्ष शिंदे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उत्कर्ष शिंदेसोबत गौतमी पाटील देखील दिसत आहे. उत्कर्ष शिंदे याने त्याच्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अहो शेट लय दिसान झालीया भेट. या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणी नंतर यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी माझं नवं लिखाण, नवं संगीत नव्या गायिकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार... लवकरच...’

उत्कर्ष शिंदे याने फोटो शेअर करून, कॅप्शनमध्ये नव्या गाण्याच्या घोषणेसोबतच गौतमी पाटीलला देखील टॅग केले आहे. यानंतर आता उत्कर्षच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये गौतमीचा देखील सहभाग असणार आहे. लावणीनंतर आता गौतमी पाटील तिच्या आवाजाची जादू देखील प्रेक्षकांना दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. आता, गौतमीचा नवा प्रोजेक्ट येणार म्हणजे त्याची हवा तर होणारच! उत्कर्षच्या या घोषणेनंतर आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे ‘तेरा पता’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यानंतर ती एका वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग