Gautami Patil Video: ‘चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका’; गौतमी पाटीलच्या नव्या लावणीचा धुमाकूळ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil Video: ‘चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका’; गौतमी पाटीलच्या नव्या लावणीचा धुमाकूळ!

Gautami Patil Video: ‘चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका’; गौतमी पाटीलच्या नव्या लावणीचा धुमाकूळ!

Updated Feb 07, 2023 06:25 PM IST

Gautami Patil Video: गौतमी पाटील हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या लावणीची झलक शेअर केली आहे.

Gautami Patil
Gautami Patil

Gautami Patil Video: आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा तिच्या नव्या लावणीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. आता गौतमी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील लावणीची झलक नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. चाहत्यांमध्ये गौतमीच्या या चित्रपटाबद्द्ल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

गौतमी पाटील हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लावणीची झलक शेअर केली आहे. गौतमी पाटील लवकरच 'घुंगरु' या आगामी चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटातीलच ही लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका’ असे या लावणीचे बोल असून, ही लावणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या लावणीतील ढोलकीचा ताल आणि गौतमीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिने स्वतःच चाहत्यांना मनोरंजन विश्वात पदार्पण करणार असल्याची माहिती दिली होती. गौतमी सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर गौतमीच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र, डान्स करताना तिच्या अश्लील हावभावांमुळे अनेकदा तिला ट्रोल केले जाते. गौतमीने आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

लावणी स्टार गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशात झालं आहे. गौतमी पाटील अभिनेता बाबा गायकवाड याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिचा ‘घुंगरू’ हा चित्रपट लावणी लोककला आणि लोकनृत्यावर आधारित आहे. मात्र, सध्या गौतमीने या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नसून, केवळ हे गाणे म्युझिक व्हिडीओ म्हणून आपल्या चॅनेलवर रिलीज केले आहे.

Whats_app_banner