मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच आले समोर, आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर दिली प्रतिक्रिया

Gautami Patil: गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच आले समोर, आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर दिली प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 02, 2023 08:51 AM IST

Gautami Patil Father: गौतमी ही वडिलांसोबत राहात नाही. ती तिच्या आईसोबत राहते. मात्र आता मुलीवर होणारी टीका पाहून वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहे.

gautami patil viral video on social media
gautami patil viral video on social media (HT)

गेल्या काही दिवसांपासून लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु होता. राजकीय वर्तुळातील अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. काहींनी गौतमीला पाठिंबा दिला तर काहींनी टीका केली. आता गौतमीचे वडील पहिल्यांदा माध्यमांसमोर येत यावर प्रतिक्रिया देताना दिसले.

गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी मुलीवर होत असलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे. “तिला पाटील आडनाव लावू नको असे कोणी कसे म्हणू शकते. पाटील ते पाटीलच राहणार. ती पाटील घराण्यातली आहे. ती जात बदलू शकेल का? तुमचे कुळ असेल तेच राहणार, ते कसे बदलेल. त्यामुळे ती पाटील आहे आणि स्वतःला पाटीलच म्हणेल,” असे गौतमी पाटीलचे वडील म्हणाले.
वाचा: गौतमी पाटीलला अमोल कोल्हेंचा पाठिंबा, म्हणाले, "ती अजूनही लहान..."

गौतमी ही वडिलांसोबत राहत नाही. तिच्या आईने तिला लहानाचे मोठे केले आहे असे गौतमीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आता पहिल्यांदाच तिचे वडील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी गौतमीला पाठिंबा देत होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष कर असा सल्ला देखील दिला आहे.

काय आहे नेमका वाद?

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा ईशा दिला. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.

IPL_Entry_Point

विभाग