Gautami Patil Dance Video: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil Dance Video: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ

Gautami Patil Dance Video: गौतमीच्या कातिला अदा! ठाण्यातील तरुण घायाळ

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 13, 2023 09:47 AM IST

Gautami Patil Diwali Special Video: गौतमी पाटीलने नुकताच ठाण्यातील दिवाळी पहाटला हजेरी लावली. या कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Gautami Patil Thane Video
Gautami Patil Thane Video

Diwali 2023: संपूर्ण देशाता दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ठाण्यात आणि डोबिंवलीमध्ये दिवाळी पहाटा ही कायमच चर्चेचा विषय ठरतो. ढोल ताशांचा गजर, मराठमोळे लूक करुन आलेली तरुण दिवाळी पहाट आणखी खास करतात. आता ठाण्यातील दिवाळी पहाटला गौतमी पाटीलची हजेरी पाहायला मिळाली. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणी सादर करत तरुणाईला घायाळ केले. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

ठाण्यामधील चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून जल्लोष करताना दिसते. सकाळ पासून तरुणाई बेधुंद पणे डीजेच्या तालावर ठेका धरताना दिसत होती. या कार्यक्रमाला गौतमी पाटील हजर होती. त्यामुळे तरुणाई गौतमी पाटीलसोबत गाण्यांच्या तालावर थिरकली.
वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

स्वत: गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळी पाहाटेला ठाण्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमातले काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरुन तुम्हाला अंदाज येईल.

'घुंगरु' या मराठी चित्रपटात गौतमी पाटील लावणी करतानाच दिसणार आहे. या चित्रपटात ती लावणी कलावंताची भूमिका साकारणार आहे. या दरम्यान तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनांमुळे ती चित्रपटाच्या नायकाच्या प्रेमात पडते. यात राजकारणचा मसाला, थरारदृश्य देखील पाहायला मिळणार आहेत. ‘घुंगरू’ या चित्रपटातील गौतमी पाटीलचा डान्स व कातीला अदा आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner