मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: महाराष्ट्राचा बिहार केला म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचे सडेतोड उत्तर

Gautami Patil: महाराष्ट्राचा बिहार केला म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचे सडेतोड उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2023 12:54 PM IST

Gautami Patil: छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेल्या घनश्याम दरोडेने गौतमीवर काही आरोप केले होते. त्यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil
Gautami Patil

गेल्या काही दिवसांपासून लावणी डान्सर गौतमी पाटील सतत चर्चेत आहे. तिच्या आडनावावरुन वाद सुरु असतानाच तिच्या नाचण्यावर देखील आक्षेप घेण्यात आला. छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेल्या घनश्याम दरोडेने गौतमीवर निशाणा साधला होता. त्याने 'गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये' असे वक्तव्य केले होते. ते ऐकून गौतमी देखील शांत बसली नाही. तिने आता घनश्यामला सडेतोड उत्तर दिले आहे.

गौतमीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये घनश्यामच्या वक्तव्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली, “मी घनश्याम दरोडेला इतकच सांगतेय की दादा सर्वात आधी तर तू माझ्या कार्यक्रमाला ये आणि माझा डान्स बघ. मग माझ्या समोर येऊन माझ्यावर आरोप कर. मला दाखव की मी काय चुकत आहे. तू थेट माझ्यावर आरोप करशील तर मी ऐकून घेणार नाही” अशा स्पष्ट शब्दात गौतमीने घनश्यामला ऐकवले आहे.
वाचा: 'स्कूप' ते 'असुर २', या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज

काय होते घनश्याम दरोडेचे आरोप?

घनश्यामने गौतमीवर टीरा करत, “सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार. तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करून मोठे होऊ नये. तुम्ही तिच्या अदा बदलाव्यात ” असे म्हटले होते.

IPL_Entry_Point

विभाग