'सबसे कातिल गौतमी पाटील' हे अगदी लहानलहान मुलांच्या तोंडूनही ऐकायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मादक अदा आणि डान्सने वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसते. आता गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतमी मराठमोळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मकरंद अनासपुरे आणि गौतमी पाटील हे 'मूषक आख्यान' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता मकरंद अनासपुरे नेहमीच काही नवे देत असतात. या चित्रपटात ते नऊ भूमिका साकारणार आहेत. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये ते गौतमी पाटीलची मुलाखत घेताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'मूषक आख्यान' या चित्रपटाच्या टीझरमध्ये मकरंद अनासपुरे हे गौतमीची मुलाखत घेताना दिसत आहेत. ते गौतमीला पहिला प्रश्न विचारतात की, तुम्हाला राजकारणात यावंसं वाटतं का? त्यावर गौतमीने, 'माझं राजकारणात जाण्याचे काहीच प्लानिंग नव्हते. पण काही गोष्टी विचित्र घडल्या. दोन-चार लावण्यांमध्ये मी पांढरी टोपी घालून नाचले. सगळ्या डान्समध्ये टोपी सांभाळली, पडू दिली नाही. सगळे म्हणाले एवढी चांगली टोपी सांभाळणारी आमच्या पाहाण्यातच नाही. त्यामुळे तू जा राजकारणात' असे उत्तर दिले.
या मुलाखतीमध्ये पुढे मकरंद यांनी गौतमीला कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न विचारला आहे. त्यावर गौतमीने, मी काही फिक्स केलेले नाही. जो मला पक्षात घेईल त्याचा पक्ष फिक्स असे उत्तर दिले. सध्या सोशल मीडियावर 'मूषक आख्यान' या चित्रपटाच्या टीझरची जोरदार चर्चा रंगली आहे. सर्वजण आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? दोन्ही मुलांसोबत राहते एकटी
अभिनेता मकरंद अनासपुरे नेहमीच काही नवे देत असतात. ‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मकरंद आणि गौतमी यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या