Gaurav More: रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gaurav More: रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी

Gaurav More: रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 18, 2024 02:58 PM IST

Gaurav More Post: गौरव मोरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी
रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड; गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी

Gaurav More Upcoming Project: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळू हसण्यास भाग पाडले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणाऱ्या गौरव मोरेची घाबरगुंडी उडाली आहे. त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गौरव नेमका कोणाला आणि कशासाठी घाबरला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गौरवने सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधीत आहे. गौरव मोरेच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'अल्याड पल्याड' असे असून या चित्रपटाचे नवे पोस्ट नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. गौरवने पोस्टर शेअर करत 'रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड. जीवावर बेतलं की घडतंय अल्याड पल्याड...!' असे कॅप्शन दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी गौरवची घाबरगुंडी का उडली आहे? असा प्रश्न विचारला आहे.
वाचा: कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत ऐकून बसेल धक्का

'अल्याड पल्याड' या चित्रपटात गौरव मोरेसोबतच सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आणि इतर काही अनुभवी कलाकार दिसणार आहेत. त्यासोबतच भाग्यम जैन हा नवा चेहरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहाता गौरव का घाबरला आहे याचे अनेक तर्कवितर्क प्रेक्षक लावताना दिसत आहेत. नेमकी काय कथा चित्रपटात पाहायला मिळणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका

आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. ‘अल्याड पल्याड' चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. आता चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whats_app_banner