महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळू हसण्यास भाग पाडले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणाऱ्या गौरव मोरेची घाबरगुंडी उडाली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘अल्याड पल्याड' चित्रपटाच्या २ मिनिटे १७ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे. का रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा
आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
‘अल्याड पल्याड' हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.
वाचा: सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार
आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.
संबंधित बातम्या