अभिनेता आणि विनोदवीर गौरव मोरे महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांचा या भयपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी याच चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
'अल्याड पल्याड’ चित्रपटात भयासोबत विनोदाची सुद्धा किनार होती. भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. 'आमचा पहिला चित्रपट लोकांना इतका आवडलाय आणि त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे याचं आम्हाला खरंच खूप छान वाटतेय, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ
'अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’ वर भरभरून प्रेम केले. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा केली.
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
'अल्याड पल्याड' चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटाला चांगलीच टक्कर दिली आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 'अल्याड पल्याड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात १.०७५ कोटी रुपयांची कमाई केली. नंतर चित्रपटाची कमाई वाढत गेली. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, 'लाईफलाईन' सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल
दर्जेदार कलाकृतीचा निर्माता म्हणून मिळणारे समाधान आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून नवनवीन विषय घेऊन येण्याची मराठीची क्षमता बघूनच मराठीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर सांगतात. ‘अल्याड पल्याड’ चा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.