गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 08, 2024 12:35 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर गौरव मोरेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने कार्यक्रम सोडण्यामागचे कारण सोडले आहे.

गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या
गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' सोनी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांना हसवण्यास यशस्वी झाला होता. आता या कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरेने कार्यक्रम सोडल्याची माहिती समोर आली आहे. पण असे काय झाले की गौरवने कार्यक्रम सोडला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा सेट दिसत आहे. या सेटचा व्हिडीओ शेअर करत गौरव भावूक झाला आहे. त्याने लांबलचक अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

काय आहे गौरवची पोस्ट?

गौरवने पोस्टमध्ये प्रेक्षकांची माफी मागितली आहे. "नमस्कार, मी गौरव मोरे पवई फिल्टर पाड्यामधून बोलत आहे.. आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिले. नाव दिले सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत.. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो" असे तो म्हणाला.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

पुढे तो म्हणाला, "महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. माध्यम सारखे राहिले आणि तुमचे प्रेम देखील ! असे म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे."
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

गौरव मोरेच्या कामाविषयी

गौरव मोरे हा सध्या सोनी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके देखील दिसत आहेत. हे तिन्ही मराठी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत. याच कार्यक्रमासाठी गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्याचे म्हटले जात आहे. तसेच गौरव 'अल्याड पल्याड' या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत.

Whats_app_banner