Gatha Navnathanchi Serial: 'गाथा नवनाथांची' मालिकेची वेळ बदलली, काय आहे नेमकं कारण?-gatha navnathanchi serial is on new timing 8 pm every day ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gatha Navnathanchi Serial: 'गाथा नवनाथांची' मालिकेची वेळ बदलली, काय आहे नेमकं कारण?

Gatha Navnathanchi Serial: 'गाथा नवनाथांची' मालिकेची वेळ बदलली, काय आहे नेमकं कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2024 01:57 PM IST

Gatha Navnathanchi Serial: सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असताना आता मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. काय आहे नेमकं कारण जाणून घेऊया..

Gatha Navnathanchi
Gatha Navnathanchi

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणार्‍या 'गाथा नवनाथांची' ह्या पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. मालिकेत आत्तापर्यंत नवनाथांचे अवतार, त्यांचा प्रवास आणि चमत्कार हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नाथांचे प्रवास व त्यांचे चमत्कार भक्त प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सुरुवातीपासूनच नाथांचा जन्म, त्यांची जडणघडण, शिकवण, गुरु-शिष्य परंपरा असा प्रत्येक नाथाचा प्रवास पाहायला मिळाला. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक नवी अपडेट समोर येत आहे. या मालिकेच्या वेळात बदल करण्यात आला आहे.

गाथा नवनाथांची मालिकेत आता महापर्व सुरू होते आहे. या महापर्वात निरनिराळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या मालिकेत अडभंगिनाथांची गोष्ट दाखवण्यात येते आहे. अडभंगिनाथांकडे महादेवांचे आगमन होणार आहे. महादेव, पार्वती आणि संपूर्ण गण असे सगळे एकत्र अडभंगिनाथांकडे विशेष भोजनासाठी येणार आहेत. आता अडभंगीनाथ महादेवांचे स्वागत कशा प्रकारे करतील, ते आता पाहता येईल. त्याव्यतिरिक्त मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, जालिंदरनाथ हे सगळे नाथ पुन्हा एकत्र पाहता येणार आहेत.

महादेवांना भीमाशंकर का म्हणतात याबद्दल महादेवांकडून स्वतः शिकवण देण्यात येणार आहे. भीमा राक्षसाने सगळीकडे विध्वंस केला होता. जीवितहानी, पशु पक्षांचं जीवन त्याने अवघड करून ठेवला होता. महादेवांनी त्याचा संहार केला. महादेवांनी भीमा राक्षसाचा कशाप्रकारे वध केला हे पाहायला मिळेल . त्यांनी केलेले चमत्कार, त्यांची शिकवण पाहायला मिळणार आहे.

काय घडणार मालिकेत?

आता 'गाथा नवनाथांची' मालिकेत नारद आणि चरपटीनाथ यांची गोष्ट पाहायला मिळते आहे. आजी आणि डाकीण यांच्याकडून चरपटीला अन्नात विष दिले जाते, पण नारद चरपटीचे रक्षण कशा प्रकारे करणार, हे आता आपल्याला पाहायला मिळाले. जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्याकडून अग्नितत्त्व आणि शक्ती कशा प्रकारे दिली जाणार, हेसुद्धा पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त नाथांची शिकवण आणि चमत्कार पाहायला मिळणार आहेत.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?

नव्या वेळेत सुरु होणार मालिका

पहिल्यांदाच सोनी वाहिनीवर एक पौराणिक मालिका सुरु आहे. गाथा नवनाथांची ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. हा वेगळा प्रयोग जनसामान्यांत लोकप्रिय झाला आहे. नवनाथांचे जन्म आणि त्यांच्या कार्यकथा दृश्य स्वरूपात कधीही सादर झाल्या नव्हत्या. या मालिकेत त्या कथा दृश्य स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner
विभाग