मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gashmeer Mahajani: रविंद्र महाजनींना होती जुगाराची सवय, मुलगा गश्मीरने सांगितले कटू सत्य

Gashmeer Mahajani: रविंद्र महाजनींना होती जुगाराची सवय, मुलगा गश्मीरने सांगितले कटू सत्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2024 10:38 AM IST

Ravindra Mahajani Autobiography: 'चौथा अंक' या आत्मचरित्र्यामध्ये रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने वडिलांबाबतचे कटू सत्य सांगितले आहे.

Ravindra Mahajani Autobiography
Ravindra Mahajani Autobiography

मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला होता. त्यांच्या निधनाच्या काही महिन्यांनंतर त्यांची पत्नी माधवी महाजन यांनी आपले आत्मचरित्र लिहून प्रकाशित केले आहे. या आत्मचरित्र्यामध्ये रविंद्र यांचा मुलगा गश्मीरने देखील लहानपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. वडिलांच्या अनेक वाईट सवयींचा उल्लेख देखील गश्मीरने केला आहे.

गश्मीरने आपल्या भूतकाळातील आठवणींबाबत लिहिताना वडील गश्मीर महाजन यांना जुगाराची सवयी होती असा देखील उल्लेख केला आहे. या सवयीमुळे झालेले परिणामांचाही उल्लेख त्याने केला. गश्मीरने म्हटले की, 'भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हेदेखील आपल्या निश्चितपणे माहित असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) माहित होते, बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होती हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहित होते. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहित होते, असेही गश्मीरने 'चौथा अंक'मध्ये नमूद केले आहे.
वाचा: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

रविंद्र महाजनींने आत्मचरित्र

माधवी महाजनी यांनी रवींद्र यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्यांनी या पुस्तकाचे नाव 'चौथा अंक' असे ठेवले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील उपस्थित होता. दरम्यान, या सोहळ्यात त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि पहिल्यांदाच पतीच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.

आत्मचरित्र्याविषयी माधवी काय म्हणाल्या?

“आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सगळेच सांगणे कठीण होते. त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या काही मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला. सुरुवातीला मी तयार नव्हते पण, प्रेक्षकांसमोर मोकळे व्हावे असे मलाही जाणवले. या पुस्तकातून माझा कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवायचा हेतू नाही. जे माझ्या आयुष्यात खरे खरे घडले ते सर्व मी लिहून काढले आहे. पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या, तर ते आत्मचरित्र झाले नसते. फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या, तर ती कादंबरी झाली असती. त्यामुळे मी सगळ्या खऱ्या घटना लिहिल्या आहेत. पण, यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. माझे दोष, त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे पुस्तक फार आधीच लिहून झाले होते. पुस्तक छापायला मी देणार होते. पण, त्याआधीच त्यांचे निधन झाले. ” असे माधवी महाजनी म्हणाल्या.

WhatsApp channel