Gashmeer Mahajani talked about father: मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह अढळला. जवळपास तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन यांनी आपले आत्मचरित्र लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत.
गश्मीर महाजनीने आई माधवी महाजनच्या 'चौथा अंक' या आत्मचरित्रात आपल्या बालपणींच्या आठवणी सांगितल्या आहेत. या आठवणींना एक दु:खाची, काळजावर घाव घालणाऱ्या घटनेची किनार आहे. वडील रविंद्र महाजनी यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचे त्याने म्हटले. घरी कधी दार बडवले जायचे, तर कधी आई एवढाच काय तो फरक असल्याचे गश्मीरने म्हटले. तसेच कोणत्या आठवणी आपल्या लक्षात राहणा हे आपल्या हातात नसल्याचे देखील सांगितले आहे.
वाचा: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
"टेनिस प्रॅक्टिस संपवून १० वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रुममधील टेबलवर माझे चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचवर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होते ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखे थांबले. कोचवर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, ‘गशू, पोलिसांना फोन लाव रे’ यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली, बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्याजागी भोकाड पसरले. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचवर ठेवली आणि ‘काही नाही झाले तुझ्या आईला’, असे म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवले जायचे, तर कधी आई एवढाच काय तो फरक” असे गश्मीर म्हणाला.
पुढे गश्मीर म्हणाला की, “बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसते. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसांच्या स्मरणशक्तीचे हे फार मोठे रहस्य आहे."
संबंधित बातम्या