आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न असे सुरेश धस म्हणाले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली. प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. आता अभिनेता गश्मीर महाजनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकताच गश्मीरने इन्स्टाग्रामवरील 'Ask Me Anything' या फिचरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी चाहत्यांनी प्राजक्ता माळीशी संबंधीत एक प्रश्न विचारला आहे. त्यावर गश्मीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एका चाहत्याने गश्मीरला, 'तुम्ही प्राजक्ता माळीला पाठिंबा देता का??' असा प्रश्न विचारला होता. त्यावर गश्मीरने, 'मला संपूर्ण प्रकरण माहिती नाही, कारण मी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये बिझी होते. पण प्राजक्ता माळी ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे. मी त्यासाठी तिचा आदर करतो' असे उत्तर दिले आहे. सध्या सोशल मीडियावर गश्मीरचे हे उत्तर व्हायरल झाले आहे.
राज्यात बीडच्या मस्साजोग प्रकरणात सरपंच संतोष देशमुख हत्येने महाराष्ट्र हादरला. आरोप प्रत्यारोपांच्या वर्तुळात भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. प्राजक्ता माळीने शनिवारी संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात परिषद घेतली. या परिषदेत ती म्हणाली, गेल्या दीड महिन्यापासून हे सुरु आहे. पण जेव्हा लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा बोलणं गरजेचं असते. राजकारणात महिला कलाकारांना का खेचता असा सवाल प्राजक्ताने केला होता.
वाचा: चंकी पांडेच्या कानशिलात तर अनिल कपूरला मारण्याची धमकी, एकेकाळी या अभिनेत्रीची होती बॉलिवूडमध्ये दहशत
त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांना जाहीरपणे माफीही मागावी लागली. या संपूर्ण प्रकरणात आपापसातील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा वापर होता कामा नये असं म्हणत प्राजक्ता माळीने भूमिका स्पष्ट केली होती. तिच्या भूमिकेवर मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी पाठिंबाही दर्शवला. यात गश्मीर महाजनीने ही प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित बातम्या