Ganeshotsav 2023 : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन, शेअर केला फोटो
Shah Rukh Khan : शाहरुखने सोशल मीडियावर घरातील गणपतीचा फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे.
संपूर्ण देशात गणोशोत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामन्यांपासून ते दिग्गजांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने सोशल मीडियावर दर वर्षी प्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याने बाप्पाचा सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
शाहरुखने सोशल मीडियावर मन्नतमध्ये बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो शेअर करत, "गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा आशीर्वाद देवो" असे कॅप्शन दिले आहे. शाहरुखच्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिलेया आहेत. काही कलाकारांचा देखील यामध्ये समावेश आहे.
शाहरुख मन्नत या त्याच्या बंगल्यामध्ये जवळपास सर्वचसण साजरे करत असतो. ईद, दिवळी, गणेशोत्सव तर मोठ्या जल्लोषात साजरा करतो. बऱ्याचदा शाहरुखची ओळख ही धर्मनिरपेक्ष अभिनेता म्हणून केली जाते. त्याच्या घरी गणपती येणे एक याचेच उदाहरण आहे.
शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ७ सप्टेंबर रोजी त्याचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत ५०० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे.