एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार! बाप्पाच्या दर्शनासाठी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो मुंबईत-ganesh utsav 2024 special chotya bayochi mothi swapna bayo in mumbai ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार! बाप्पाच्या दर्शनासाठी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो मुंबईत

एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार! बाप्पाच्या दर्शनासाठी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो मुंबईत

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 07, 2024 09:20 AM IST

सध्या सगळीकडे गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आली आहे.

chotya bayochi mothi swapna
chotya bayochi mothi swapna

सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे भक्तीमय वातावरण दिसत आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सर्वसामान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगाम झाले आहे. काही मालिकांच्या सेटवर गणपती बाप्पा आले आहेत. तर काही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या घरी बप्पाचे आगमन झाले आहे. 'तुज माजं सपान' या मालिकेत गणेश चर्तुर्थी विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. तर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' आणि 'भूमिकन्या' या मालिकांमध्येही बाप्पा आल्याचे पाहायला मिळणार आहे.

'तुज माजं सपान' या मालिकेत गणेशोत्सव विशेष भाग

सगळ्यांची लाडकी 'तुज माजं सपान' या मालिकेत वीरू आणि प्राजक्ता हे ओझरला गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मालिकेच्या विशेष भागात त्यांनी ओझरला जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मालिकेचा संपूर्ण चमू तिथं उपस्थित होता आणि तिथे चित्रीकरण करून बाप्पांचे आशीर्वाद घेतले आहेत. बाप्पांच्या विशेष दर्शनाने त्यांच्या नात्यात आलेले दुरावे संपतील का आणि ते पुन्हा एकत्र येऊन त्यांचा संसार सुरळीत चालेल का? हे आगामी भागात पाहायला मिळणार.

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत वेगळे वळण

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत यामिनी सराफ आणि राजवीर सराफ यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याशिवाय राजवीर आणि मयूरी हे दोघं पालीच्या गणपती दर्शनालाही जाणार आहेत. पालीच्या गणपती मंदिराला भेट देऊन तिथलं दर्शन मालिकेतून प्रेक्षकांना घडवणार आहेत! राजवीर आणि मयूरी यांच्या लग्नानंतर बाप्पांचं आगमन पहिल्यांदाच होणार आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोचली आहे, पण सराफांच्या घरी बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात साजरं केलं जाणार आहे. सराफांच्या घरी चक्क सोन्याच्या गणपतीची मूर्ती बसवणार आहेत. मयूरी आणि राजवीर घरच्या बाप्पांचं आगमन करतील. त्यांचं बाप्पांकडे एकच मागणं आहे की त्यांचं एकमेकांवरलं प्रेम असंच राहू दे आणि दिवसेंदिवस वाढू दे आणि त्यांच्या आयुष्यातले अडथळे दूर होऊ देत.

'भूमिकन्या' मालिकेत वेगळे वळण

'भूमिकन्या' मालिकेत लक्ष्मी आपले वडील बळी यांच्याबरोबर बाप्पांची मूर्ती साकारताना दिसणार आहेत. बळी आणि लक्ष्मी यांनी ती मूर्ती एकत्र सेटवरच साकारली आहे आणि मालिकेतले सगळे कलाकार याच मूर्तीची पूजा करताना दिसणार आहेत. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं आणि त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी लक्ष्मी गणपती बाप्पांपुढे प्रार्थना करणार आहे. त्याशिवाय लक्ष्मी टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. मालिकेचा चमू टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात जाऊन चित्रीकरण करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना तिथले दर्शनही आपोआपच घडणार आहे.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेत बयो आणि इरा चक्क मुंबईतून कोकणात बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मालिकेत कोकणातल्या गणेशउत्सवाचे दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन सर्वत्र जोरदार पद्धतीने करण्यात येते आहे. गणेशउत्सवाच्या काळात सर्वत्र गणपतीचा जल्लोश असणार आहे. गणेशउत्सवाचा जल्लोश सगळ्या मालिकांमध्येही पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner