Cm Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानसह पोहोचले अर्पिताच्या घरी Video viral
Ganesh Utsav 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता सलमान खानसोबत अर्पिता खानच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.
संपूर्ण देशात गणोशोत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामन्यांपासून ते दिग्गजांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत गणेशोत्सव खूप लोकप्रिय आहे. अनेक कलाकार आपल्या घरी गणेशमूर्ती ठेवून उत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे यावेळीही सलमान खानच्या बहिणीच्या घरी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्पिताच्या घरी दर्शनसाठी पोहोचले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
अर्पिता भाऊ सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही एकत्र अर्पिताच्या घरी पोहोचले आहेत. यावेळी सलमानने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या एकत्र व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: मुलीसोबतचा किसिंग सीन ते दारुचा नाद; जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी
यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरच्या गणपती बाप्पाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये सलीम खान बाप्पाची आरती करताना दिसत होते.
बॉलिवूडमधील शाहरुख खान, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी, मनीष मल्होत्रा, अर्पिता खान व आयुष शर्मा, सारा अली खान, सलमान खान आणि इतर काही कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. अनेक कलाकार एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यास अनेक कलाकार पोहोचले होते.