Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!

Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!

Oct 19, 2024 05:41 PM IST

Pocso On Ekta Kapoor : 'गंदी बात'या वादग्रस्त वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

Ekta Kapoor
Ekta Kapoor

Pocso On Ekta Kapoor : प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावर 'अल्ट बालाजी' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलींच्या अश्लील दृश्यांचे प्रदर्शन केल्याबद्दल पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'गंदी बात' या वादग्रस्त वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. या तक्रारीत असे नमूद केले आहे की, फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत, 'अल्ट बालाजी'ने त्यांच्या एका वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य दाखवले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रार पत्रात असा आरोप केला आहे की, आधी या वेब सीरिजमध्ये सिगारेटचा वापर करत महापुरुषांचा आणि संतांचा अपमान करण्यात आला होता. या घटनेनंतर याच सीरिजमध्ये पोक्सोच्या नियमांचे उल्लंघन करत काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, वुमन प्रोहिबिशन ॲक्ट १९८६ आणि सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम २००३ यासारख्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या तक्रारदाराने यामध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही माहिती न्यायालयाने घेतलेल्या टिप्पण्या आणि देशभरातील बाललैंगिक घटनांच्या वाढत्या चिंतेनंतर उघडकीस आली आहे. यामुळे एकता कपूर आणि 'अल्ट बालाजी' या कंपनीच्या कामकाजावर आता गंभीर परिणाम होऊ शकतो.

सलमान खानच्या जीवावर उठलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर बेव सीरिज बनणार? कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या…

एकता कपूरच्या कंपनीवर गुन्हा दाखल

'गंदी बात' वेब सीरिज भारतातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिजपैकी एक आहे. परंतु, या सीरिजने अनेकदा वादग्रस्त चर्चांना निमंत्रण दिले आहे. अशा परिस्थितीत, आता एकता कपूरवर करण्यात आलेले हे आरोप अतिशय गंभीर आहेत. तक्रारदाराने न्यायालयाकडे या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. आधुनिक डिजिटल मनोरंजनाच्या युगात, या प्रकारच्या गुन्ह्यांचे गंभीर परिणाम अतिशय वाईट होऊ शकतात. बालकांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकता कपूर आणि तिच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने डिजिटल माध्यमांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकता कपूर आणि 'अल्ट बालाजी'ने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, त्यांचे भविष्य यावर अवलंबून आहे की, ते या आरोपांवर काय जबाब देतात. सध्या, या प्रकरणामुळे एकता कपूरच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

Whats_app_banner