मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2024 08:12 AM IST

‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय सीरिजमध्ये ‘लॅनिस्टर’ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन झाले.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी
‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय सीरिजमध्ये ‘लॅनिस्टर’ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इयान गेल्डर यांच्या मृत्यूला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. ही बातमी कळताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयान गेल्या पाच महिन्यांपासून कॅन्सरने त्रस्त होते. ही लढाई लढत असतानाच त्यांनी सोमवारी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इयान गेल्डरचे जोडीदार आणि सह-अभिनेता बेन डॅनियल्स यांनी मंगळवारी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी लिहिले, 'इयान गेल्डर गेल्या पाच महिन्यांपासून पित्त नलिकेच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने मला सांगावे लागत आहे की, ते आता या जगात नाहीत. गेल्डर यांना डिसेंबरमध्ये कर्करोगाचे निदान झाले होते आणि सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांची काळजी घेण्यासाठी मी हातातली सगळी कामं सोडली होती. पण, ते इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असे वाटले नव्हते.’

‘या’ चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकले!

बेन डॅनियल्सने पुढे लिहिले की, 'गेल्डर यांनी आपल्या आजाराचा खूप धैर्याने सामना केला. ते एक दयाळू, उदार आणि प्रेमळ व्यक्ती होते. त्यांच्या कामाने अनेक कलाकारही प्रभावित झाले होते.’ अभिनेते इयान गेल्डर ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या पाच सीझन्समध्ये झळकले होते. याशिवाय ते 'फादर ब्राउन' या वेब सीरिजमध्येही दिसले होते. याव्यतिरिक्त, इयान गेल्डर यांच्या ‘टॉर्चवुड’, ‘हिज डार्क मटेरिअल्स’, ‘डॉक्टर हू’, ‘स्नॅच’, ‘द बिल’ आणि इतर अनेक चित्रपट आणि सीरिज गाजल्या होत्या.

टीव्हीपासून केली करिअरची सुरुवात!

इयान गेल्डर त्यांच्या ‘डॉक्टर हू’ या सीरिजच्या १२व्या सीझनमधील ‘झेलिन’च्या भूमिकेसाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकेपासून केली होती. १९७२मध्ये आयटीव्हीची मालिका ‘न्यू स्कॉटलंड यार्ड’मधील एका भागात ते झळकले होते. त्यांच्या निधनानंतर आता चाहते आणि नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. जगभरात अभिनेत्याचा मोठा चाहता वर्ग होता.

IPL_Entry_Point

विभाग