Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

Jan 10, 2025 01:45 PM IST

Game Changer Review : ‘गेम चेंजर’ हा चित्रपट प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार यांच्यातील लढाईवर आधारित आहे. कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू
४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

Game Changer Review In Marathi : साऊथ सुपरस्टार अभिनेता रामचरण याचा बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ४५० कोटी रुपये लावून बनलेला ‘गेम चेंजर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राम चरण, कियारा अडवाणी आणि एसजे सूर्या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा मूळचा तेलुगू चित्रपट आहे, जो संपूर्ण भारतात वेगवगेळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे एस शंकर यांचा शेवटचा चित्रपट ‘इंडियन २’ होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाला होता. त्यामुळे त्यांना या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यांचा ‘गेम चेंजर’ हा चित्रपट प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार यांच्यातील लढाईवर आधारित आहे. कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

काय आहे चित्रपटाची कथा?

‘गेम चेंजर’ या चित्रपटाची सुरुवात भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने होते. राम चरणच्या एन्ट्रीसाठी एक लांबलचक ॲक्शन सीन ठेवला आहे. त्यांनंतर जबरदस्त गाणं पाहायला मिळालं. या चित्रपटात तो आयएएस अधिकारी राम नंदनच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय रामच्या इतर पात्रांबाबत ‘गेम चेंजर’मध्ये एक ट्विस्ट आहे, जो तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. यावेळी राम चरण फक्त दुहेरी भूमिका करताना दिसत आहे.

बोबिली मोपीदेवी (जेएस सूर्या) नावाचा खलनायक पांढरा पोशाख परिधान करून राजकारणातून भ्रष्टाचाराच्या कारवायांचे नेतृत्व करताना दिसत आहे. चित्रपट राजकीय नाटकासोबतच भरपूर सस्पेन्स आणि ॲक्शन ॲक्शनने थ्रिल भरलेला आहे. आता साऊथची हीच टिपिकल जादू तुम्हाला अनुभवायची असेल, तर एकदा हा चित्रपट पाहावा लागेल.

हातात गोड पदार्थ होता आणि कानावर कडू बातमी पडली! हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं अन्...

एकंदरीत कसा आहे हा चित्रपट?

एकंदरीत हा चित्रपट साऊथ मसाला चित्रपट पाहणाऱ्यांसाठी पर्वणी आहे. राम चरणसोबत कियारा अडवाणीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच दिसली आहे. मात्र, चित्रपटात भन्नाट गाणी वापरली गेली आहेत. ‘गेम चेंजर’ची कथा ही धमाकेदार आहे. एसजे सूर्या प्रत्येक दृश्यात सर्व कलाकारांना पुरून उरताना दिसतो. चित्रपटाच्या कथेत फार काही नवीन नाही. पण यावेळी शंकरने त्याच्या आधीच्या अनेक चित्रपटांचे कॉकटेल सादर केले आहे.

यात मुख्य अभिनेत्याची झलक पण नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. अण्णा आणि सत्यमूर्ती यांचा चळवळीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास राजकारणातील एका मोठ्या घटनेची आठवण करून देऊ शकतो. चित्रपटाचा अर्धा तास फ्लॅशबॅक हा चित्रपटाचा सर्वात दमदार भाग आहे. संपूर्ण चित्रपट भ्रष्टाचाराच्या राजकारणावर आहे.

बघावा की नाही?

लेखक कार्तिक सब्बाराज यांनी ‘गेम चेंजर’ची पटकथा लिहिली आहे, आशयाची नाडी चांगल्याप्रकारे समजून घेऊन तो एक योग्य मास-मसाला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये त्याला काही प्रमाणात यश आले आहे. सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट आहे आणि व्हीएफएक्सद्वारे ॲक्शन सीक्वेन्स प्रभावी दिसतात. तुम्ही हा चित्रपट एकदा नक्कीच बघू शकता.

Whats_app_banner