Gadar 2: अखेर ‘गदर २’च ठरला अव्वल; शाहरुखच्या ‘पठान’ बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadar 2: अखेर ‘गदर २’च ठरला अव्वल; शाहरुखच्या ‘पठान’ बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला!

Gadar 2: अखेर ‘गदर २’च ठरला अव्वल; शाहरुखच्या ‘पठान’ बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला!

Sep 29, 2023 08:26 AM IST

Gadar 2 Breaks Pathaan Record: ‘गदर २’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून, अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आता या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटाला मागे टाकले आहे.

Gadar 2 Breaks Pathaan
Gadar 2 Breaks Pathaan

Gadar 2 Breaks Pathaan Record: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल अभिनित ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून, अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल कपूर यांनी केले होते. आता ‘गदर २’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘गदर २’च्या कलेक्शनचे नवे आकडे शेअर केले आहेत. या आकड्यांवरून आता स्पष्ट झाले आहे, की हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

‘गदर २’ने शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘गदर 2’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवे आकडे शेअर केले आणि सांगितले की, हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्याने भारतात ५२४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुख खानचा ‘पठान’ बराच काळ पहिल्या क्रमांकावर टिकून राहील, अशी अपेक्षा होती. पण, ‘गदर २’ आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घातला. अखेर सगळे रेकॉर्ड मोडत आता ‘गदर २’ने अव्वल स्थान पटकावले आहे.

Chandramukhi 2: कंगना रनौतला मोठा झटका; नुकताच रिलीज झालेला ‘चंद्रमुखी २’ इंटरनेटवर लीक?

अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. ‘गदर: एक प्रेम कथा’ या पहिल्या भागाच्या रिलीजच्या जवळपास दोन दशकांनंतर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला. ‘गदर २’मध्ये अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा, गौरव चोप्रा, मनीष वाधवा, मनोज बक्षी, सिमरत कौर, लव सिन्हा आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात सनीने तारा सिंह नावाच्या ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारली होती. तर, अमीषाने १९४७मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी तारा सिंहच्या प्रेमात पडलेल्या ‘सकीना’ची भूमिका साकारली होती. ‘गदर २’ हा चित्रपट तारा सिंहच्या आयुष्यावर आधारित आहे, जो धाडसी प्रयत्न करून मुलाला वाचवण्यासाठी देशाची सीमा ओलांडतो. त्याच्या पाकिस्तानमध्ये पकडल्या गेलेल्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने केली आहे. 'गदर २' हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३पासून ‘झी५’वर स्ट्रीम होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘गदर २’चे ओटीटी हक्क ५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

Whats_app_banner