Gadar 2 Breaks Baahubali 2 Record: सध्याच्या घडीला चित्रपटगृहांमध्ये चांगलाच हल्लाकल्लोळ पाहायला मिळत आहे. सनी देओलच्या ‘गदर २’नंतर आता ‘जवान’ची जादू चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘जवान’ रिलीज झाल्यामुळे याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. 'जवान' रिलीज झाल्यानंतर सनी देओलच्या 'गदर २'साठी ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडणे फार कठीण जाईल, असे मानले जात होते. पण, सनी देओलच्या या चित्रपटाने रिलीजच्या २९व्या दिवशी ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडला आहे.
शाहरुख खानचा ‘जवान’ रिलीज झाल्यामुळे ‘गदर २’च्या कमाईचा वेग खूपच कमी झाला होता. पण, २९व्या दिवसाच्या कलेक्शननंतर ‘गदर २’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘गदर २’चा हा विक्रम ऐकल्यानंतर सनी देओल आणि त्याच्या चाहत्यांना त्यांचा आनंद आवरता आला नाही. ‘गदर २’ने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत अनेक रेकॉर्ड केले आहेत. सनी देओल आणि अमीषा पटेल या जोडीने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
‘गदर २’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर मीडिया रिपोर्टनुसार २९व्या दिवशी या चित्रपटाने १ कोटींचा व्यवसाय केला आहे. या कलेक्शननंतर सनी देओलच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५११ कोटी झाले आहे. तर, ‘बाहुबली २’चे एकूण कलेक्शन ५१०.९९ कोटी रुपये होते. अशा परिस्थितीत ‘गदर २’ने प्रभासच्या चित्रपटालामागे टाकले आहे. सनी देओल, अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘गदर २’ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवरील आपली जबरदस्त पकड कायम ठेवली होती.
११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.
संबंधित बातम्या