Gadar 2 Box Office Collection: सध्या बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ आणि ‘गदर २’ चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सनी देओल याचा ‘गदर २’ हा चित्रपट आता चांगलाच चर्चेत आला आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर 'जवान', 'पठान' आणि 'गदर २'मध्ये स्पर्धा सुरू आहे. 'पठान'ने २०२३मध्ये हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. मात्र, सनी देओलचा चित्रपट 'गदर २' आणि शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 'पठान'चा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आले आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते हे दोन्ही चित्रपट एक-दोन दिवसांत 'पठान'चा विक्रम मोडतील. असे झाल्यास 'जवान' हा पहिला आणि 'गदर २' हा हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरेल. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट रिलीज होऊन ४८ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने ४८व्या दिवशी ३०लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाची एकूण कमाई ५२४.३० कोटींवर पोहोचली आहे.
'गदर २' हा चित्रपट केवळ हिंदी भाषेत रिलीज झाला होता. शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने हिंदी भाषेत ५२४.५३ कोटींचा व्यवसाय केला होता. म्हणजे आता 'गदर २' या चित्रपटाला 'पठान'चा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या २३ लाख रुपयांची गरज आहे. तर, 'जवान'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुख खानच्या या चित्रपटाने २१व्या दिवशी ५.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र, या सगळ्या वादळात ‘गदर २’ चांगलाच तग धरून राहिला आहे.
‘गदर २’ने दिल्ली, यूपी, पूर्व पंजाब, राजस्थान आणि बिहारमध्ये बंपर कमाई केली आहे. सहाव्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली आहे. मात्र, सनी देओलचे चाहते सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत.
संबंधित बातम्या