Gaarud : स्वप्न, शोध, स्वार्थ...शोधाच्या वाटेत हरवलेलं 'गारुड' नेमकं आहे तरी काय? लवकरच मिळणार प्रश्नाचं उत्तर!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gaarud : स्वप्न, शोध, स्वार्थ...शोधाच्या वाटेत हरवलेलं 'गारुड' नेमकं आहे तरी काय? लवकरच मिळणार प्रश्नाचं उत्तर!

Gaarud : स्वप्न, शोध, स्वार्थ...शोधाच्या वाटेत हरवलेलं 'गारुड' नेमकं आहे तरी काय? लवकरच मिळणार प्रश्नाचं उत्तर!

Published Oct 21, 2024 12:41 PM IST

Gaarud Marathi Movie : शोधाच्या अन्वेषणात हरवलेलं गारुड शोधणारी ही कथा म्हणजेच 'गारुड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर आली आहे.

Gaarud Marathi Movie
Gaarud Marathi Movie

Gaarud Marathi Movie : माणसाच्या जीवनात स्वप्न, शोध आणि स्वार्थ यांचा एक अद्भुत संगम असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर काहीतरी शोधात असतो, ज्यात काही कल्पनातीत, काही आत्मशोध आणि काही साध्या पण असामान्य गोष्टींचा समावेश असतो. याच शोधाच्या अन्वेषणात हरवलेलं गारुड म्हणजेच 'गारुड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर आली आहे. येत्या २५ ऑक्टोबरपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

'गारुड' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून गुपितांचे एक साम्राज्य उलगडताना दिसते, याच्या सुरुवातीलाच सटवाईने लिहिलेलं नशिब काय असते हे उलगडत जातं. या चित्रपटात सूडाची भावना, सत्य-असत्याचा शोध आणि मानवतेच्या गूढतेचा अभ्यास या चित्रपटात करण्यात आलेला आहे. हे सर्व एकत्र मिसळून चित्रपटाची कथा तयार झाल्याने ते पटकथेला देखील एक वेगळी धार देतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि दमदार अभिनेते शशांक शेंडे यांच्यासह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे यांचा देखील समावेश आहे. या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्याची तयारी केली आहे. ‘गारुड’ या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

Gaarud : गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध घेणार ‘गारुड’; रहस्यमय चित्रपटाची पहिली झलक पाहून वाढली प्रेक्षकांची आतुरता!

'गारुड' चित्रपटाची निर्मिती 'किमयागार फिल्म्स एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे. निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, आणि श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी या प्रकल्पावर काम केले आहे. सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांच्या चित्रपटाची ही कथा डॉ. प्रमोद खाडिलकर यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी सांभाळली असून, पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटील यांनी घेतली आहे.

मोजक्याच ठिकाणी होणार प्रदर्शित

गुपिते, रहस्ये, आणि मानवतेच्या खोलीत हरवलेले 'गारुड' काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २५ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, स्वप्नांच्या, शोधांच्या, आणि आत्मशोधाच्या या अद्भुत विश्वात एक भव्य सफर करण्याची संधी मिळणार आहे. 'गारुड' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक नवीन चर्चा उभारण्याची आशा आहे.

Whats_app_banner