Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट

Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 17, 2024 02:01 PM IST

Funny Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेता संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिकेचा एक मेजशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल...

santosh juvekar and Kushal Badrike
santosh juvekar and Kushal Badrike

मनोरंजनविश्वातील कलाकार हे पडद्यावर जसे एकमेकांचे जिगरी दोस्त असल्याची भूमिका साकारतात. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही हे कलाकर एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते. अशीच एक मराठी इंडस्ट्रीमधील जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दरम्यान, कुशलने संतोषसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करताना दिसतो. १२ डिसेंबर रोजी संतोष जुवेकरचा वाढदिवस होता. त्याला वाढदिवसाला गिफ्ट घेण्यासाठी कुशल संतोषला घेऊन मॉलमध्ये गेला होता. पण तिथे गेल्यावर संतोषची जी फजिती झाली ती पाहून कुशला देखील हसू अनावर झाले आहेत.

काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओमध्ये संतोष त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट मिळावे म्हणून कुशलला घेऊन मॉलमध्ये गेला होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्याची फजिती झाली आणि याच फजितीच्या झलक कुशलने त्याच्या व्हिडीओमधून दाखवली आहे. संतोषला कुशलकडून एका लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून हवे होते. पण दोघेही मॉलमध्ये पोहोचले तेव्हा समजलं की, त्या ब्रॅंडचं शोरुम कायमचंच बंद झालं आहे. त्यामुळे संतोषचा हा कुशलकडून महागडं गिफ्ट घेण्याचा प्लॅन फसला. संतोषचा झालेला पोपट पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले आहे.

काय म्हणाला कुशल?

कुशलने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, “तसं आम्ही मैत्रीत गिफ्ट वगैरे देत-घेत नाही. पण संत्या या सगळ्याला अपवाद आहे, आता त्याला कोणत्या तरी एका ब्रॅंडचे शूज ‘माझ्या कडून’ बर्थडे गिफ्ट म्हणून हवेच होते. खरं तर त्याचा बर्थडे होऊन आता आठवडा उलटून गेला आहे. तरीही त्या गिफ्टसाठी आज तो मला जबरदस्तीने मॉलला घेऊन गेला. हे कोण मित्र असतात जे गिफ्टसाठी एवढी जबरदस्ती करतात? अरे काय गिफ्ट आहे की खंडणी” असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

सोशल मीडियावर संतोष आणि कुशलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. स्वत: संतोषने या व्हिडीओवर कमेंट करत, “पण तू सुटलायस असं समजु नकोस… सबका बदला लेगा ये फैजल” असे म्हटले आहे. तर कुशल आणि संतोशची मैत्रिण अभिनेत्री हेमांगी कवीने, “उद्या आपण पॅलेडियम फिनिक्स मॉलला जात आहोत” असे म्हटले आहे.

Whats_app_banner