मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 09, 2024 12:49 PM IST

सोशल मिडिया खोलताच सर्वात पहिले 'गुलाबी साडी' हे गाणे कानावर पडते. पण सध्या ट्रेंडमध्ये असलेले हे गुलाबी साडी गाणे कुठून आले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Gulabi Sadi:  'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?
Gulabi Sadi: 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

जुन्या काळात गाणी ऐकण्यासाठी रेडीओचा वापर केला जायचा. या रेडीओवर ठराविक वेळेत गाणी वाजवली जायची. त्यानंतर घरोघरी टीव्ही दिसू लागल्या. या टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका, गाणी आणि चित्रपट लागू लागले. प्रेक्षक ते पाहण्याचा आनंद घेऊ लागले. काही काळानंतर मोबाईल फोन आले आणि यूट्यूबवर गाणी येऊ लागली. आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यांचे रिल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातही सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो.

ट्रेंडिंग न्यूज

पहिले गाणी केवळ ऐकली जायची. आता सोशल मीडियावरील रिल्समुळे गाणी पाहून त्यावर अनेकजण डान्स करताना दिसतात. २०२४ या वर्षात वेगवेगळे ट्रेंड येताना दिसत आहेत. यामध्ये गुलाबी साडी गाण्याची क्रेझ तर सातासमुद्रापार पाहायला मिळत आहे. अनेकजण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण या गाण्याचा ट्रेंड कुठून सुरु झाला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
वाचा: संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कलाकारांनी केले गाण्याचे रिल्स

'गुलाबी साडी' हे गाणे गायक संजू राठोरने गायले आहे. या गाण्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली. मग ते आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा मैदानात बनवलेले रिल्स असू देत किंवा अभिनेत्री माधुरी दीक्षितने सेटवर बनवलेले रिल्स असू देत. अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवे आहेत. रेमो डिसूजा आणि इतरही काही मराठी कलाकार यामध्ये सहभागी आहेत. या प्रत्येक गाण्याला जवळपास मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावरील अल्गोरिदमने या गाण्याला हिट केले आहे. सगळीकडे सजेशनमध्ये देखील हे गाणे येत आहे. त्यामुळे या गाण्याचा चांगलाच ट्रेंड सुरु झाला.
वाचा: गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?

कसे सुचले गुलाबी साडी गाणे?

संजूने नुकताच सकाळ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी गुलाबी साडी हे गाणे कसे सुचले याविषयी माहिती दिली आहे. 'गुलाबी साडी हे गाणे मी दिवाळीच्या दिवशी सकाळी लिहिले होते. माझ्या डोक्यात एकच प्रश्न सुरु होता काय करायचे? तेव्हा काही कारणांमुळे मी दिवाळीला घरी देखील गेलो नव्हतो. मग घरी बसून काय करायचे असा प्रश्न मला पडला होता. तेव्हा वाटू लागले की नवीन काहीतरी शोधूयला हवे. तेव्हा वाटले की प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो आणि नऊवारी साडी हे गाणे होतेच. मग नऊवारी साडीचा सिक्वेल आहे तर त्याच्याशीच संबंधित गाणे तयार करायला हवे. म्हणून मग मी गुलाबी साडी हे गाणे तयार केले' असे संजू म्हणाला.
वाचा: राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग