मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड कलाकार भाड्याच्या घरात राहणे का पसंत करतात? जाणून घ्या कारण

बॉलिवूड कलाकार भाड्याच्या घरात राहणे का पसंत करतात? जाणून घ्या कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 01, 2024 07:44 PM IST

इम्रान खान, क्रिती सेनॉन, कार्तिक आर्यन, विकी कौशल आणि बॉलिवूडमधील इतरही काही कलाकार हे भाड्याने राहात असल्याचे पाहायला मिळते. काय आहे त्या मागचे कारण? चला जाणून घेऊया...

बॉलिवूड कलाकार भाड्याच्या घरात राहणे का पसंत करतात?
बॉलिवूड कलाकार भाड्याच्या घरात राहणे का पसंत करतात? (IANS)

बॉलिवूड कलाकार कधी काय करतील याचा नेम नसतो. अनेक कलाकार या मायानगरीत कोट्यवधी रुपये देऊन हव्या असलेल्या ठिकाणी घर घेऊन स्थायिक होतात. तर काही कलाकार हे महिन्याला कोट्यवधी रुपये भाडे देण्यास तयार असतात. नुकताच बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन यांनी वांद्रे परिसरात चित्रपट निर्माता करण जोहरचे घर भाडे तत्त्वावर घेतले. पण कलाकार घर भाड्याने का घेताता? यामागे नेमके काय कारण आहे चला जाणून घेऊया.

इम्रान आणि लेखाने करणच्या घरासाठी ९ लाख रुपये महिन्याचे भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांव्यतिरिक्त क्रिती सेनॉन, कार्तिक आर्यन, विकी कौशल आणि कतरिना कैफ या कलाकारांनी देखील भाडेतत्त्वार घरे घेतली आहेत. काही कलाकार असेही आहेत त्यांनी केवळ मालमत्ता भाड्याने देण्याच्या उद्देशाने रिअर इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
वाचा: AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण

Zapkey ने सादर केलेल्या करारानुसार, इम्रान खानने कार्टर रोड, वांद्रे येथील क्लेफेपेट येथे करण जोहरकडून भाड्याने तीन मजली अपार्टमेंट घेतली आहे. त्यांच्या कराराची नोंदणी २० मार्च २०२४ रोजी करण्यात आली आहे. तसेच इम्रानने या घरासाठी २७ लाख रुपये डिपॉजिट दिले आहे. इम्रानचे स्वत:चे घर असताना देखील त्याने हा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

बॉलिवूड कलाकार घर खरेदी करण्याऐवजी भाडे तत्त्वावर का राहतात?

बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत जे आता स्वत:चे घर घेऊ शकतात. पण अनेकदा त्यांना काही विशिष्ट ठिकाणी घर घ्यायचे असते. जसे की सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये घर हवे असते. अशा वेळी सी फेसिंग घर खरेदीसाठी उपलब्ध असणे गरजेचे असतात. जर अशी घरे भाडे तत्त्वावर मिळत असतील तर तेथे भाड्याने राहण्याकडे कलाकारांचा कल असतो. त्यांच्या आवडीचे अपार्टमेंट विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो.
वाचा: मलायका आणि शुरा पहिल्यांदाच आमनेसामने, अरबाज खानचा व्हिडीओ व्हायरल

Zapkey चे सह-संस्थापक संदीप रेड्डी यांनी याविषयी माहिती दिली आहे. "मनासारखे घर खरेदीसाठी मिळत नसल्यामुळे भाड्याने घेणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. तसेच करिअरच्या सुरुवातील कलाकारांचे उपन्न हे नक्की नसते. त्यामुळे दर महिन्याला एखाद्या मोठ्या रक्कमेचा हफ्ता भरणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे ते अपार्टमेंट खरेदी करण्यापेक्षा जास्त रक्कम भाड्याने खर्च करण्यावर करतात" असे ते म्हणाले.

वरिष्ठ संचालक, निवासी सेवा आणि विकासक उपक्रमचे अध्यक्ष रितेश मेहता यांच्या मते, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्रीमियम सी-फेसिंग अपार्टमेंट्स पसंत करतात जे त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी विक्रीसाठी सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे ते भाड्याने राहणे पसंत करतात. “ते प्रथम फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्यास प्राधान्य देतात. परंतुसोबतच त्यांना हव्या असलेल्या घराचा शोध देखील घेत असतात. एकदा त्यांना त्यांच्या आवडीचे अपार्टमेंट सापडले की ते शेवटी ते विकत घेतात. अशी काही प्रकरणे देखील घडली आहेत ज्यामध्ये नव्या कलाकारांनी पहिले भाड्याने घर घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अपार्टमेंट परवडत नाही. याशिवाय, त्यांची कमाई नियमित नसते आणि ते नियमित मोठ्या रक्कमेचा ईएमआय भरु शकत नाहीत. असे देखील काही कलाकार आहेत जे केवळ भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नासाठी अपार्टमेंट विकत घेतात,” असे ते पुढे म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग