छोट्या पडद्यावरील सतत चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं.’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत एका सामान्य कुटुंबातील एक पत्नी-सून आणि आई अशा तिहेरी जबाबदाऱ्या अतिशय संयमीपणे सांभाळणाऱ्या अश्विनी वाघमारे या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. आता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या आदित्य वैद्यने मैत्रीदिनानिमित्त खऱ्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या आहेत.
मैत्रिणीविषयी बोलताना आदित्य वैद्य म्हणाला की, "मराठी इंडस्ट्रीतील माझ्या मैत्रीबद्दल बोलताना मला एकाच व्यक्तीच नाव आठवत त्या म्हणजे संजना, जी माझी प्रिय मैत्रिण आहे. मी त्यांचा सोबत मालिकांमध्ये काम करायला सुरवात केली त्या वेळेपासून आम्ही चांगले मित्र झालो. माझ्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतरही संजना जी एकट्या होत्या ज्यांनी मैत्री कायम ठेवली. त्यांनी मला नेहमी प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले. त्यांनी मला 'तू चल पुढं' या मालिकेत काम करण्यास प्रोत्साहन दिले."
पुढे मित्राविषयी बोलताना आदित्य म्हणाला, "माझा आणखीन एक मित्र म्हणजे गणेश सरकटे आहे जो 'तू चाल पुढं' या आमच्या मालिकेत पांड्याची भूमिका करतो. मालिकेत त्याला माझा प्रिय मित्र दाखवण्यात आला आहे, पण ऑफस्क्रीनवरही आम्ही दोघांनीही अशीच मैत्री जपली आहे. मी व्यावसायिकता आणि मैत्री यांच्यातील समतोल चांगल्या प्रकारे व्यवस्थित हाताळतो. अर्थात मी कामाच्या बाबतीत व्यावसायिक खूप आहे आणि कामाच्या व्यतिरिक्त खूप मैत्रीपूर्ण आहे. माझे हे मित्र माझ्यासाठी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये खूप महत्वाचे आहेत. मी त्यांना माझे जवळच मानतो."