Friday The 13Th Special Horror Movies : आज शुक्रवार आणि १३ तारीख हा विचित्र संयोग आहे. या दिवसाला अतिशय हॉरर दिवस देखील मानला जातो. जगभरात अनेक ठिकाणी आजच्या दिवशी कोणतेही काम केले जात नाही. इतकंच काय तर आजच्या दिवशी कोणतेही व्यवहार करण्यास देखील बंदी आहे. असं म्हणतात की, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं गेलं, त्या दिवशी १३ तारीख आणि शुक्रवार होता. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये हा दिवस अशुभ आणि हॉरर मानला जातो. आजच्या दिवशी तुम्ही देखील खास हॉरर चित्रपट बघून आपला दिवस आणखी हटके पद्धतीने घालवू शकता.
८ सप्टेंबर १९६० रोजी प्रदर्शित झालेला 'सायको १९६०' हा चित्रपट त्याच्या नावासारखाच आहे. हा एक अमेरिकन हॉरर चित्रपट आहे, जो मेरियन भोवती फिरतो. याचे दिग्दर्शन अल्फ्रेड हिचकॉक यांनी केले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांवरून तुम्ही या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. या चित्रपटाला गोल्डन ग्लोबसह अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
२०१८साली प्रदर्शित झालेला 'द नन' हा चित्रपट एक भयपट आहे. ज्याचे दिग्दर्शन जो कॉरिने हार्डीने केले होते. त्याचा दुसरा सिक्वेल २०२३मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे तर, डेमियन बिचिर, तैसा, जोनास ब्लोकेटसह अनेक मोठे स्टार्स यात आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. हा चित्रपट तुम्हाला जिओ सिनेमावर पाहू शकता.
'इट' हा हॉलिवूडचा चित्रपट असला तरी त्याची देशातही खूप चर्चा झाली. हा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात विदूषक वेशातील व्यक्ती लहान मुलांना त्रास देतो. चित्रपटात अशी भितीदायक वळणे आहेत की, आपण एकट्यात हा चित्रपट पाहू शकत नाही. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'द काँजरींग' ही एक अमेरिकन हॉरर फ्रँचायझी आहे, जी जगभरातील सर्वोत्कृष्ट अलौकिक भयपट चित्रपटांपैकी एक मानली जाते. या चित्रपटाचा पहिला भाग २०१३ मध्ये, दुसरा २०१६मध्ये आणि तिसरा भाग २०२१मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
राही अनिल बर्वे आणि आनंद गांधी यांनी मिळून बनवलेला 'तुंबाड' हा २०१८चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात सोहम शाह मुख्य भूमिकेत होता आणि या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. नुकताच हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट हस्तर नावाच्या राक्षसावर आधारित आहे. आधी हा चित्रपट युट्यूबवर पाहू शकता.
संबंधित बातम्या