छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉसचा पाचवा सिझन इतर सिझनपेक्षा विशेष गाजला. या सिझनमध्ये कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले होते. त्यामध्ये अगदी खेडेगावातून आलेल्या सूरज चव्हाणचा देखील सहभाग आहे. सूरज हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे. त्यामुळे त्याने बिग बॉस मराठी जिंकावे अशी अनेकांची इच्छा होती. ती इच्छा बिग बॉसने खरच पूर्ण केली. आता सूरजच्या नावावर फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत. नुकताच सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विनंती केली आहे की कोणीही माझ्या नावावर पैसे मागितले असता कृपाया देऊ नये. त्यानंतर सूरजने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती देखील केली आहे.
सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला, 'नमस्ते मी आपल्या महाराष्ट्राचा सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत, त्यामुळे दिलेला कोड स्कॅन करुन पैसे पाठवा. निश्चित त्याच्यापर्यंत ही आर्थिक मदत आम्ही पोचवू असे म्हटले आहे. माझ्या नावाचा फेक आयडी काढून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला फॅन्सने बळी पडू नये ही विनंती. जे कोणी या पोस्ट टाकत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल' असे म्हटले आहे. सोबतच त्याने विनंती करत हात जोडणारा इमोजी वापरला आहे.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? दोन्ही मुलांसोबत राहते वेगळी
टिक टॉक या अॅपने सूरजला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तो टिक टॉक वरील टॉप व्हिडीओ क्रिएटर्सपैकी एक होता. तो चांगले पैसे कमावत होता. तसेच प्रसिद्ध असल्यामुळे त्याला अनेक कार्यक्रमांना देखील बोलावण्यात येत होते. त्यावेळी तो फक्त एखाद्या उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी ८० हजार रुपये घ्यायचा. पण अनेक जवळच्या लोकांनी त्याची फसवणूक देखील केली. आता बिग बॉसचा विजेता झाल्यामुळे सूरजचा मानधनात वाढ झाली असणार असे अनेकांचे म्हणणे आहे.