Aarushi Nishank News: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची कन्या आरुषी पोखरियाल निशंक हिची चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली येथे चित्रपट निर्मात्या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आपल्या वडिलांना खोट्या प्रकरणात अडकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही आरुषीने केला आहे.
दोघांनीही आपण मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असून 'आंखे की गुस्ताखियां' हा चित्रपट बनवत असल्याचे सांगितले, ज्यात शनाया कपूर, विक्रांत मेस्सी सारखे मोठे कलाकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हेतर त्यांनी या चित्रपटात आरुषीला भूमिका देऊ केली आणि तिला त्याच्या फर्म किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकल्पाच्या १५ कोटी रुपये म्हणजेच १५ टक्के लाभ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आरुषी स्वत:हून या भूमिकेची पटकथा फायनल करू शकते, असे बोलले जात होते. जर तिला ही भूमिका आवडली नाहीतर, तिचे ५ कोटी रुपये १५ टक्के व्याजासह परत केले जातील, असे अश्वासन देण्यात आले. यानंतर आरुषीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आरुषीने गेल्या वर्षी १०, २७, ३० ऑक्टोबर आणि १९ नोव्हेंबर या चार हप्त्यांमध्ये त्यांना चार कोटी रुपये दिले. मात्र, यानंतर दोन्ही आरोपींनी ना काम दिले ना पैसे परत केले. आता त्यांकडून तिला धमक्या दिल्या जात आहेत, असाही आरोप तिने केला.
संबंधित बातम्या