मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant in Trouble: राखी सावंत आणि समीर वानखेडे यांच्यात जुंपली! नेमकं काय झालं?

Rakhi Sawant in Trouble: राखी सावंत आणि समीर वानखेडे यांच्यात जुंपली! नेमकं काय झालं?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 20, 2024 09:04 AM IST

Rakhi Sawant Vs Sameer Wankhede Case: समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात ११ लाख रुपयांचा खटला दाखल केला आहे.

राखी सावंतचा मोठा पंगा! समीर वानखेडे यांनी दाखल केला खटला
राखी सावंतचा मोठा पंगा! समीर वानखेडे यांनी दाखल केला खटला

Rakhi Sawant Vs Sameer Wankhede Case: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता समीर वानखेडे यांनी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतवर देखील खटला दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात ११ लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. समीर यांनी आपल्या याचिकेत राखी आणि काशिफवर आपली बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेली मॉडेल मुनमुन धमेचा हिची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी वकील अली काशिफ खान यांनी चांगलाच जोर लावला होता. सोशल मीडियावर आपली बदनामी केल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांनी दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Mirzapur 3 Poster: इतकी वाट पाहिल्यानंतर ‘मिर्झापूर ३’चं पोस्टर आलं; पण नेटकरी भडकले! नेमकं झालं तरी काय?

‘मी ११ लाख रुपये देईन पण...'

राखी सावंत आणि अली काशिफ खान यांना भविष्यात आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणीही त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. समीर वानखेडे यांनी सध्या त्यांच्या पोस्टवरील कमेंट्स सेक्शन बंद केले आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना वकील अली काशिफ खान म्हणाले की, 'जेव्हा जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलले जाते, तेव्हा बदनामी होत नाही, असे कायद्यात म्हटले आहे. आयपीसीच्या कलम ४९९मधील दुसरा परिच्छेद 'लोकसेवकांच्या सार्वजनिक वर्तन'बद्दल भाष्य करतो. सार्वजनिक कार्ये पार पाडताना सार्वजनिक सेवकाच्या वर्तनाचा आदर करून किंवा त्याच्या चारित्र्याचा आदर करून कोणतेही मत सद्भावनेने व्यक्त करणे ही बदनामी नाही, असे त्यात म्हटले आहे. आता हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही त्यावर योग्य उत्तर देऊ. जर, त्यांनी त्यांचा मुद्दा बरोबर असल्याचं सिद्ध केलं, तर मी त्यांना ११ लाख रुपये देईन.’

Sidhu MooseWala: नवजात बाळाच्या जन्मावर पंजाब सरकारने उपस्थित केला प्रश्न! सिद्धू मुसेवालाचे वडील संतापले

काय म्हणाली राखी सावंत?

या प्रकरणी राखी सावंतच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा व्हिडीओ समोर आलेला नाही. मात्र, राखीने तिच्या अनेक जुन्या वक्तव्यांमध्ये आर्यन खानला निर्दोष ठरवून, त्याचे समर्थन केले होते. राखीने तिच्या एका व्हिडीओमध्ये समीर वानखेडे यांना उद्देशून म्हटले होते की, 'मी खूप दुःखी आहे, आपण सर्व मिळून प्रार्थना करूया की, आर्यनला लवकरात लवकर जामीन मिळावा. खरे काय, खोटे काय ते कळत नाही. कोण कोणाला फसवतंय, मला एकच सांगायचं आहे की, तुम्ही लोक सिंह असाल तर सिंहाशी लढा. कोल्हे बनू नका आणि लहान मुलाची शिकार करू नका.’ आर्यन खानच्या अटकेनंतर राखी सावंतसह इतर अनेक सेलिब्रिटीही आर्यन खानच्या समर्थनात उतरले होते.

IPL_Entry_Point