बॉलिवूडमध्ये १९८० साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. महाभारत बनवणारे बीआर चोप्रा यांच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. त्या वेळच्या बड्या स्टार्सना या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं, लोकांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे रेल्वेचं मोठं नुकसानही झालं होतं.
तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का?नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. 'द बर्निंग ट्रेन' असं या चित्रपटाचं नाव होतं. जवळजवळ संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण ट्रेनमध्ये झाले होते. चित्रपटाची कथा अशी आहे की, रुळावर धावणाऱ्या ट्रेनला कट रचून आग लागते. तसेच ट्रेनचे ब्रेकही काम करणे बंद करतात. यानंतर चित्रपटातील नायक आणि नायिका ट्रेनमधील प्रवाशांचा जीव वाचवतात. या चित्रपटात धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र, हेमा मालिनी, परवीन बाबी, नीतू सिंग आणि डॅनी डेन्जोंगपा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटात ट्रेनमधील आग स्पेशल इफेक्ट्ससह दाखवण्यात आली आहे. स्पेशल इफेक्ट्ससाठी हॉलिवूडमधून तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी रेल्वेकडून ट्रेन भाड्याने घेतली होती. दरम्यान, गोळीबाराच्या एका सीनमुळे केवळ रेल्वेच नव्हे तर रेल्वे आणि मालमत्तेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रेल्वेने निर्मात्यांकडे पैशांची मागणी केली असता निर्मात्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, त्यामुळे ते भरपाईही करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
वाचा: मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स इतके चांगले होते की ट्रेनची आग एकदम खरी दिसत होती. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर जिओ सिनेमा, अॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टारवर पाहू शकता. त्यावेळी या चित्रपटाचे बजेट खूप जास्त होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने फारशी कमाई न केल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासोबत रेल्वेच्या डब्यांचे देखील नुकसान झाले होते.
संबंधित बातम्या