आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव तसेच या चित्रपटात कोणता अभिनेता दिसणार हे समोर आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालिची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे नाव 'धर्मा- दि एआय स्टोरी' असे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शन करणार आहे. पुष्कर जोगने आजवर मराठी सिनेसृष्टीला हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...
'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोगने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, "मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल."
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप
यापूर्वी पुष्कर जोग एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला होता. सर्वेसाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यामुळे त्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काही वेळातच त्याने दिलगिरी व्यक्त केली होती. 'वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो' असे पुष्कर म्हणाला होता.
वाचा: बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी
संबंधित बातम्या