अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी ही राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या शाही लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रीवेडींग कार्यक्रम, प्रीवेडींग पार्ट्या, बॅचलर पार्टी या सगळ्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. या लग्नपत्रिकेसाठी सोने आणि चांदीचा वापर करण्यात आला आहे.
राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची बरीच चर्चा सुरु आहे. १ ते ३ मार्च रोजी त्यांच्या प्रीवेडींग सोहळ्याला सुरुवात झाली होती. गुजरातमधील जामनगर येथे हा सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, गायिका रिहाना अशा अनेक जगभरातील दिग्ग्जांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता २९ मे ते १ जून रोजी दुसरी प्रीवेडींग पार्टी आयोजित करण्यात आली होती. इटलीमधील या पार्टीला सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि इतर बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी
अनंत आणि राधिकाचा लग्न सोहळा हा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी छापलेल्या लग्नपत्रिकेची सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनंत आणि राधिकाच्या लग्नच्या पुत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये लग्नपत्रिकेसाठी सोने आणि चांदीचा वापर केल्याचे दिसत आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ
लग्नाच्या पत्रिकेसाठी एक बॉक्स तयार करण्यात आला आहे. हा बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये चांदीचे मंदीर दिसत आहे. या मंदिरामध्ये काही देवतांच्या सोन्याचे पाणी मारलेल्या मूर्ती दिसत आहेत. तसेच त्यासोबत देण्यात आलेल्या पत्रिकमेमध्ये फ्रेम्स आहेत. या फ्रेम्समध्ये श्री गणेश, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, राधा-कृष्ण, देवी दुर्गा अशा काही देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. एका बॉक्समधील डिझायनर कपड्यावर ‘अ’ आणि ‘र’ म्हणजेच अनंत आणि राधिका ही सुरुवातीची अक्षरे लिहिण्यात आली आहेत. त्यानंतर एका फ्रेममध्ये लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
वाचा: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का
गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता मार्च महिन्यात प्रीवेडींग सोहळा पार पडला. त्यापाठोपाठ ईटलीमध्ये दुसरा प्रीवेडींग सोहळा पार पडला. आता १२ जुलै रोजी मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पडणार आहे. नीता अंबानी यांनी अनंतच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे हा शाही लग्नसोहळा पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या