Fire Accident Singer Shaan : गायक शान राहत असलेल्या इमारतीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशीरा घडली असून, आग संपूर्ण घरात पसरल्याने इमारतीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते. या दरम्यान, शानचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो कुटुंब आणि अनेक लोकांसह इमारतीच्या बाहेर उभा आहे.
रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी शान आणि त्याचे कुटुंबीय घरात उपस्थित होते. पण चांगली गोष्ट म्हणजे सर्वजण आता सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले.
गायक शान हे संगीत क्षेत्रातील एक असे नाव आहे ज्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. शान राहत असलेल्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली, आणि या माहितीमुळे त्याच्या चाहत्यांच्या कपाळावर चिंतेची रेषा उमटली आहे. इमारतीला आग लागल्याचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तातडीने काम सुरू करण्यात आले. अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
शानच्या इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. इमारतीला आग लागली असून, तेथून धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे. अनेक अग्निशमन गाड्या इमारतीच्या खाली उभ्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मात्र विजेच्या बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गायक आणि त्याचे कुटुंबीय सुखरूप असल्याने चाहते खूश आहेत. त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते.
गायक शान मुखर्जीला ‘गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. तो भारतातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकांपैकी एक आहे. शानने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमध्ये जिंगल्स गाऊन केली होती. यानंतर त्याचे अनेक अल्बम रिलीज झाले आणि त्यानंतर शानने बॉलिवूडमध्ये आपली शानदार कारकीर्द घडवली. शानची अशी अनेक गाणी आहेत, जी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
संबंधित बातम्या