FIR On Orry : बॉलिवूड सेलेब्सचा लाडका मित्र ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीसह 8 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैष्णो देवी, कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवतरमानी ऊर्फ ऑरी आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, कटरा पोलीस ठाण्यात ऑरी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ऑरी, दर्शन सिंह, पार्थ रैना, ऋतिक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अर्झामास्किना या आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अनास्तासिला अर्झामास्किना हा रशियन नागरिक आहे. तो ऑरी आणि त्याच्या मित्रांसोबत कटरा येथे गेला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी या आठ जणांविरुद्ध एफआयआर (क्र. ७२/२५) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियासी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स नाऊला एक निवेदन दिले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसपी कटरा, डेप्युटी एसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ऑरी याच्यासह सर्व आरोपींना नोटीस पाठवून तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. एसएसपी रियासी यांनी सांगितले की, जे लोक कायद्याचे उल्लंघन करतात, विशेषत: धार्मिक स्थळांवर मद्य किंवा अंमली पदार्थांचे सेवन यासारख्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
संबंधित बातम्या