Filmy Kissa : एकत्र झळकणार होते संजय -सलमान, अर्ध शूटिंगही झालं; पण का रिलीज झाला नाही चित्रपट? वाचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Filmy Kissa : एकत्र झळकणार होते संजय -सलमान, अर्ध शूटिंगही झालं; पण का रिलीज झाला नाही चित्रपट? वाचा किस्सा

Filmy Kissa : एकत्र झळकणार होते संजय -सलमान, अर्ध शूटिंगही झालं; पण का रिलीज झाला नाही चित्रपट? वाचा किस्सा

Jan 31, 2025 05:48 PM IST

Filmy Nostalgia Kissa : आज आम्ही तुम्हाला संजय दत्त आणि सलमान खान यांच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो कधीच प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटाचं चित्रीकरण देखील झालं होतं.

एकत्र झळकणार होते संजय -सलमान, अर्ध शूटिंगही झालं; पण का रिलीज झाला नाही चित्रपट? वाचा किस्सा
एकत्र झळकणार होते संजय -सलमान, अर्ध शूटिंगही झालं; पण का रिलीज झाला नाही चित्रपट? वाचा किस्सा

Salman Khan-Sanjay Dutt Movie : बॉलिवूड सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनाही आवडले होते. संजय दत्त आणि सलमान ‘चल मेरे भाई’ आणि ‘साजन’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, संजय दत्त आणि सलमान खान यांचा एक असा चित्रपट आहे, जो कधीच प्रदर्शित झाला नाही. संजय दत्त आणि सलमान खान यांच्या या  चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी केले होते. या चित्रपटाचे शूटिंग देखील झाले होते. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

संजय आणि सलमानच्या चित्रपटाचे झालेले शूटिंग!

तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का? नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं नाव ‘दस’ होतं. ‘दस’ हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. संजय दत्त आणि सलमान खानव्यतिरिक्त शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होत्या. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे जवळपास ४० टक्के शूटिंग पूर्ण झाले होते, परंतु त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

सलमान खानच्या शुटींगच्या सेटवर अज्ञात व्यक्तीची घुसखोरी! पोलिसांनी चौकशी केल्यावर म्हणाला, 'बिश्नोईला सांगू का...'

चित्रपट का प्रदर्शित झाला नाही?

चित्रपटाचे जवळपास संपूर्ण चित्रीकरण होऊनही हा चित्रपट का प्रदर्शित झाला नाही, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर त्याचे उत्तर असे आहे की, १९९७ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक मुकुल आनंद यांचे निधन झाले. त्यामुळे हा चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही. संजय दत्त आणि सलमान खान यांचा हा चित्रपट देशभक्तीपर चित्रपट असणार होता. मात्र, दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. 

चित्रपट आला नाही पण गाणं गाजलं!

सलमान-संजयचा हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला, तरी या चित्रपटातील एक गाणे आजही ऐकायला मिळते. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम असो वा, प्रजासत्ताक दिन तुम्ही एकदा तरी हे गाणे ऐकले असेलच. ‘सुनो गौर से दुनिया वालों’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं अल्बममधलं आहे हे अनेकांना माहित आहे. पण, फार कमी लोकांना हे माहीत असेल की, हे गाणं सलमान खान आणि संजय दत्तच्या या चित्रपटासाठी लिहिलं गेलं होतं. सलमान आणि संजयचा सिनेमा रिलीज झाला असतं, तर त्यात हे गाणं नक्कीच पाहायला मिळालं असतं.

Whats_app_banner