मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hemant Dhome: शिकारी बाबूच्या गळ्यातला दात कायद्यानं घशात घालण्यात यावा; हेमंत ढोमेचं संतापजनक ट्वीट

Hemant Dhome: शिकारी बाबूच्या गळ्यातला दात कायद्यानं घशात घालण्यात यावा; हेमंत ढोमेचं संतापजनक ट्वीट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 25, 2024 11:00 AM IST

Hemant Dhome On Sanjay Gaikwad Viral Video: आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त व्हिडिओवर हेमंत ढोमेने संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

Hemant Dhome And Sanjay Gaikwad
Hemant Dhome And Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad Tiger Hunted Viral Video: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओत त्यांनी वाघाची शिकार करून त्याच वाघाचा दात गळ्यात घातल्याचा दावा केला. यानंतर संजय गायकवाड यांच्याविरोधात कयदेशीर करवाई व्हावी, अशी मागणी वन्यप्रेमी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी ट्विटरद्वारे संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

हेमंत ढोमे यांनी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती! आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय!”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संजय गायकवाड यांना त्यांच्या गळ्यातील दाताबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणतात की, हा दात हा दात वाघाचा आहे. मी १९८७ मध्ये एका वाघाची शिकार केली होती. त्याच वाघाचा हा दात आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीचा असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या 'सामना' च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

वन्यजीव कायदा काय सांगतो?

१९७२ मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू झाल्यानंतरच वाघांच्या शिकारीवर अधिकृत बंदी लागू झाली. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत भारतीय वाघाचे वर्गीकरण करण्यात आले. हा कायदा वाघांची शिकार, शिकार आणि वाघाची कातडी, हाडे आणि शरीराच्या अवयवांच्या व्यापारापासून संरक्षण प्रदान करतो. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना पहिल्यांदा दोषी ठरल्यास तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यानंतर दोषी आढळल्यास किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

IPL_Entry_Point