Filmfare OTT Awards 2023 Winner List: 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात वेब सीरिजचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला आहे. रविवारी (२७ नोव्हेंबर) पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटांना आणि वेब सीरिजना वेगवेगळ्या विभांगामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात यंदा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या एका वेब सीरिजने आपला जलवा दाखवला आहे. या सीरिजमध्ये अभिनेता अपारशक्ती खुराणा आणि अभिनेत्री वामिका गब्बी हे मुख्य भूमिकेत झळकले होते. या वेब सीरिजमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची कथा दाखवण्यात आली आहे. अपारशक्ती खुराणा आणि वामिका गब्बी यांच्या 'जुबली' या वेब सीरिजने फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३मध्ये तब्बल ९ पुरस्कार पटकावले आहेत. चला तर पाहूया यंदाच्या 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३'च्या विजेत्यांची यादी...
सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी)- अभिषेक बॅनर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कॉमेडी)- मानवी गागरु
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जुबली (विक्रमादित्य मोटवानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शरनाज पटेल (TVF ट्रिपलिंग सीझन ३)
सर्वोत्कृष्ट कथानक- कोहरा (गुंजीत चोपडा आणि डिग्गी सिसोदिया)
सर्वोत्कृष्ट संवाद- स्कुप (कारण व्यास)
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- कोहरा (गुंजीत चोप्रा आणि सुदीप शर्मा)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- जुबली (अपर्णा सूद आणि मुकुंद गुप्ता)
सर्वोत्कृष्ट संपादन- जुबली (आरती बजाज)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जुबली (प्रतीक शाह)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- जुबली (श्रुती कपूर)
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- जुबली (अपर्णा गगलानी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- जुबली (अलोकनंदा दासगुप्ता)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साऊंड ट्रॅक- जुबली (अमित त्रिवेदी आणि कौसर मुनीर)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- जुबली (कुणाल शर्मा आणि ध्रुव पारेख)
सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन ओरिजनल- TVF पिचर्स
सर्वोत्कृष्ट कथा- सिर्फ एक बंदा ही काफी है (दीपक किंगरानी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- मोनिका व मे डार्लिंग (स्वप्नील सोनावणे)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- कला (मीनल अग्रवाल)
सर्वोत्कृष्ट संपादन- डार्लिंग्स (नितीन बैद)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- डार्लिंग्स (अनिर्बन सेनगुप्ता)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- मोनिका ओ माय डार्लिंग (अंचित ठक्कर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (शॉर्ट फिल्म)- मृणाल ठाकूर (जाहान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (शॉर्ट फिल्म)- मानव कौल (फिर कभी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता वेब ओरिजनल (क्रिटिक्स)- मोनिका ओ माय डार्लिंग (राजकुमार राव)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेब ओरिजनल (क्रिटिक्स)- कठहल (सान्या मल्होत्रा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेब ओरिजनल (क्रिटिक्स)- गुलमोहर (शर्मिला टागोर)