Filmfare Awards 2024: '12वी फेल'ने मारली बाजी! या अभिनेत्रीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार-filmfare awards 2024 winner list is here read ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Filmfare Awards 2024: '12वी फेल'ने मारली बाजी! या अभिनेत्रीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Filmfare Awards 2024: '12वी फेल'ने मारली बाजी! या अभिनेत्रीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2024 02:02 PM IST

Filmfare Awards 2024 winner list: यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या अभिनेता आणि अभिनेत्रीने बाजी मारली जाणून घ्या...

Filmfare Awards 2024
Filmfare Awards 2024

चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'फिल्मफेअर.' गुजरातमधील गांधी नगर येथे ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२४चे आयोजन करण्यात आले होते. यंदा कोणत्या कोणत्या चित्रपटांनी बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यावेळी अभिनेता विक्रांत मेसीचा '12वी फेल', अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल या चित्रपटांनी बाजी मारली. चला जाणून घेऊया विजेत्यांची यादी...

६९व्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी

लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार

दिग्दर्शक डेविड धवन

सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक्स

जोरम

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शत

विधु विनोद चोप्रा यांनी '12वी फेल'साठी हा पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट चित्रपट

१२वी फेल

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी आलिया भट्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेता

रणबीर कपूर अॅनिमल चित्रपटासाठी

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेता

आदित्य रावल

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री

अलीजेग अग्निहोत्री

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक

तरुण डुडेजा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका

रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटासाठी शबाना आझमी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स

राणी मुखर्जी आणि शेफाली शाह

सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स

विक्रांत मेसी

सर्वोत्कृष्ट संगीत

अमिताभ भट्टाचार्य

सर्वोत्कृष्ट म्यूझिक अल्बम

अॅनिमल

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर

भूपिंदर बब्बल

सर्वोत्कृष्ट कथा

अमित राय ओएमजी २

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले

विधु विनोद चोप्रा १२वी फेल

सर्वोत्कृष्ट डायलॉग

इशिता मोइत्राला रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमासाठी

कधी सुरु झाला फिल्मफेअर पुरस्कार?

१९५४ साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात धाली. २००५ साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे ११ पुरस्कार मिळाले होते. या सोहळ्याला दिग्गजांची देखील उपस्थिती असते.

विभाग