Viral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

Jan 29, 2024 12:47 PM IST

Filmfare Awards 2024 Viral Video: ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडीओ रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आहे.

Filmfare Awards 2024 Viral Video
Filmfare Awards 2024 Viral Video

Filmfare Awards 2024 Viral Video: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यासाठी २०२४ या वर्षाची सुरुवात खूपच चांगली ठरली आहे. रविवारी अर्थात २८ जानेवारी रोजी झालेल्या ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आलिया आणि रणबीर दोघांनीही बाजी मारली. रणबीर कपूरला 'ॲनिमल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अर्थातच दोन्ही मोठे पुरस्कार यंदाच्या वर्षी रणबीरच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान, आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो या अवॉर्ड फंक्शन दरम्यान पत्नीसोबत डान्स आणि किस करताना दिसत आहे.

६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडीओ रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर ६९व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर त्याच्या 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र, यावेळी डान्स करताना रणबीर कपूर अचानक स्टेजवरून खाली उतरला आणि पत्नी आलियासोबत डान्स करू लागला होता.

Priya Bapat: नाट्यगृहात सगळीकडे कचराच कचरा; प्रिया बापट संतापली! फोटो शेअर करत म्हणाली...

यावेळी रणबीर आणि आलिया दोघांनीही डोक्यावर ग्लास ठेवून डान्स केला होता. आलिया देखील रणबीरच्या याच डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसली. यानंतर डान्स करून पुन्हा परतताना रणबीरने सगळ्यांसमोरच आलियाच्या गालावर किस केले. दोघांचा हा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे चाहते खूप कौतुक करत आहेत. त्यांच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेक यूजर्स रणबीरला ‘जंटलमन’ म्हणत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'रणबीर आणि आलिया नेहमीच त्यांचे आयुष्य अतिशय खुलेपणाने जगतात. त्यांची मुलगी खूप भाग्यवान आहे’. आणखी एकाने लिहिले की, 'बॉलिवूडहे हे कपल खूपच क्यूट आहे.' अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Whats_app_banner