चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'फिल्मफेअर.' आता लवकरच 'फिल्मफेअर पुरस्कार २०२४' हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची मराठी तसेच हिंदी कलाकारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यंदा हा पुरस्कार सोहळा मुंबई ऐवजी गुजरातमध्ये पार पडणार असल्याचे समोर आले आहे.
चित्रपटसृष्टीमधील अतिशय जुना आणि ग्लॅमरस पुरस्कार सोहळा म्हणून फिल्म फेअर ओळखला जातो. यंदा ६९वा हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यात कोणत्या कलाकारांना गौरवण्यात येणार? कोणत्या चित्रपटांना हा पुरस्कार मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी पुरस्कार सोहळ्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यामुळे कलाकारांमध्ये उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
वाचा: ही तर तोंडावरच आपटेल; बॉडीकॉन ड्रेसमुळे मलायका झाली ट्रोल
गुजरातमधील गांधीनगर येथे 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०१२४' पार पडणार आहे. २८ जानेवारी २०२४ रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचान कोण करणार हे अद्याप समोर आलेले नाही. अनेक कालाकार या पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर करुन मजामस्ती करताना दिसतात.
१९५४ साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात धाली. २००५ साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे ११ पुरस्कार मिळाले होते. या सोहळ्याला दिग्गजांची देखील उपस्थिती असते.