फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 10, 2024 10:07 AM IST

दादरमधील शिवाजी पार्कात खळबळ उडाली आहे. एक मराठी निर्माता फास घेण्याची धमकी देत झाडावर चढला आहे.

Shivaji Park
Shivaji Park

मुंबईतील दादारमधील छत्रपती शिवाजी पार्कातील एका झाडावर चढून मराठी चित्रपट निर्मात्याने आंदोलन सुरु केले आहे. त्याने अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (AWBI) सुरू असलेल्या जाचक वसुलींच्या विरोधात हे आंदोलन सुरु केले आहे. त्याचे हे आंदोलन पाहून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या निर्मात्याचे नाव प्रविणकुमार मोहरे असे आहे. ते ज्या झाडावर चढले आहेत त्या झाडावर त्यांनी मागण्यांचा बॅनर लावला आहे. प्रविणकुमार यांनी हे आंदोलन अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून वसूल करण्यात येत असलेल्या शुल्काविरोधात सुरू केले आहे. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी तेथे पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रविणकुमार यांना झाडावरून उतरण्याची विनंती केली. पण, ते कोणाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. आपली सुटका करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास गळफास घेऊ अशी धमकी त्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलीस, अग्निशमक दलाच्या जवानांना दिली आहे.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?

काय आहे प्रविणकुमार यांची मागणी?

चित्रपटात प्राण्यांचा वापर करायचा असल्यास AWBI ला ३० हजार रुपये द्यावे लागतात. त्यानंतर आम्हाला AWBI कडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळते. जर, आम्ही हे शुल्क भरले नाही तर ते दृष्य चित्रपटातून वगळावे लागते. याचा अर्थ ३० हजार रुपये भरले तर शूटिंग दरम्यान प्राण्यांसोबत होणारा कथित अन्याय थांबणार का असा प्रश्न प्रविणकुमार यांनी विचारला आहे.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल

पुढे ते म्हणाले की, "आमचा चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहे. चित्रपटात पाळीव प्राण्यावर दृष्ये चित्रीत करण्यात आले आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने आता हा चित्रपट रिलीज कसा करायचा असा सवाल आमच्या समोर आहे. जनावरांच्या बेकायदेशीपणे कत्तली रोखण्याऐवजी AWBI कडून प्राण्यांवरील कथित छळ रोखण्याऐवजी निर्मात्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप केला आहे."
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

अग्निशमन दलाने झाडावर चढून उतरवण्याचा प्रयत्न

अग्निशमन दलाने झाडावर चढून या दिग्दर्शकाला खाली उतरवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना ‘मागे व्हा, मला माझी मागणी मांडू द्या’, अशी विनंती दिग्दर्शक करतोय. चित्रपटात प्राण्यांबद्दल काही सीन्स असले तर त्यासाठी ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून NOC लागते. मात्र या NOC साठी नेहमी निर्माते-दिग्दर्शकांकडून 30-30 हजार रुपये लुबाडले जातात, असा आरोप प्रवीण कुमार मोहारे यांनी केला आहे.

Whats_app_banner