मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Collection Day 1: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी!

Fighter Collection Day 1: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी!

Jan 26, 2024 09:00 AM IST

Fighter Box Office Collection Day 1: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीने ‘फायटर’ पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली. तर, हृतिक रोशनच्या फायटिंग सीन्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Fighter Box Office Collection Day 1
Fighter Box Office Collection Day 1

Fighter Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस आहे. ‘फायटर’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘फायटर’ने पहिल्याच दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला आणि प्रेक्षकांचे किती मनोरंजन केले हे जाणून घेऊया. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक हृतिक रोशनच्या या चित्रपटाचे सतत कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीने ‘फायटर’ पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे, हृतिक रोशनच्या फायटिंग सीन्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे. बऱ्याच काळानंतर हृतिक रोशन ‘फायटर’च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकला आहे. याआधी तो ‘वॉर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व कमाई करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. नुकतीच ‘फायटर’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारीही समोर आली आहे.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी कंगना रनौतने पाहिली अद्भुत घटना! पोस्ट शेअर करत म्हणाली...

सॅकनिल्कच्या कलेक्शन रिपोर्टनुसार, ‘फायटर’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी २२ कोटींची कमाई केली आहे. मात्र, सध्या ही आकडेवारी सुरुवातीची आणि अंदाजे आहे, मात्र, यामध्ये आणखी काही बदल होऊ शकतात. अर्थात हे आकडे आगळ्या भाषांचे मिळून आहेत. चित्रपट व्यापार व्यावसायिकांनी आधीच याचे अंदाज बांधले होते. ‘फायटर’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी २० ते २५ कोटी रुपयांची कमाई करेल, असे म्हटले जात होते. हृतिक-दीपिका आणि अनिल कपूर यांच्या चित्रपटासाठी ही खूप चांगली सुरुवात मानली जात आहे. आता, शनिवार आणि रविवार ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला वीकेंडचा पुरेपूर फायदा मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या आधी अभिनेता हृतिक रोशनच्या मागील ॲक्शन फिल्म ‘वॉर’ने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाने ५३ कोटींची शानदार ओपनिंग करून सर्वांना चकित केले होते. तर, त्याच्या ‘बँग-बँग’ या चित्रपटाने २७ कोटींच्या कलेक्शनसह दमदार ओपनिंग घेतली होती. ‘फायटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘पठान’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'फायटर'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'फायटर' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp channel