मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Advance Booking: रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने कमावले कोट्यवधी

Fighter Advance Booking: रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने कमावले कोट्यवधी

Jan 24, 2024 08:57 AM IST

Fighter Advance Booking Day 1: हृतिक रोशनच्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. पहिल्याच दिवशी ‘फायटर’ छप्परफाड कमाई करणार आहे.

Fighter Advance Booking
Fighter Advance Booking

Fighter Advance Booking Day 1: सध्या चाहते बॉक्स ऑफिसवर येणाऱ्या नव्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत. आता हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर 'फायटर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फायटर’ हा चित्रपट रिलीज होण्यास आता अवघा एक दिवस बाकी असून, चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे 'पठान'ने नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली होती, तशीच यावर्षी ‘फायटर’ हा चित्रपट करेल, अशी आशा चाहत्यांना आहे. ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यासोबतच चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही जोरात सुरू आहे. पहिल्या दिवशी ‘फायटर’ छप्परफाड कमाई करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिलीज होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर 'फायटर'ची क्रेझ दिसू लागली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दमदार पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची चर्चा खूप वाढली आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी आता चित्रपटगृहांमध्ये चांगलीच गर्दी होणार आहे. ‘फायटर'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकताच, सॅकनिल्क रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात ‘फायटर’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत.

Riya Sen Birthday: पार्टीत मुलीला किस ते न्यूड एमएम एस लीक; ‘या’ वादांमुळे चर्चेत राहिली रिया सेन!

'फायटर'ने पहिल्या दिवशी हिंदी ‘२डी’मध्ये आतापर्यंत ६६,४५९ तिकिटांची विक्री केली गेली आहे. तर, हिंदी ‘३डी’साठी आतापर्यंत 'फायटर'च्या ८७,५६९ तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. हिंदी आयमॅक्स ३डीसाठी 'फायटर'ची ७,४३२ तिकिटे आधीच बुक झाली आहेत. हिंदी ४डीX३डीसाठी 'फायटर'ची २,४७३ तिकिटे विकली गेली आहेत. यासोबतच 'फायटर'च्या पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये देशभरात १,६३,९३३ तिकिटे विकली गेली आहेत. तर, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच ५.१७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

'फायटर'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनचे आकडे पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट २५ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. हृतिक रोशनचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाऐवजी एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होत आहे. जर, 'फायटर'ला अ‍ॅडव्हान्स बुकिंगप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला तर, बॉक्स ऑफिसवर पहिल्या ४ दिवसांतच १०० कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा आहे. सध्या या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. ‘फायटर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर'मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर यांच्यासोबत करण सिंह ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४