बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने काल त्याचा ५५वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थिती त्याने वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी बॉबीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाच्या निमित्ताने पापाराझी आणि चाहते बॉबीच्या घराबाहेर जमले होते. तिथे बॉबीचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. दरम्यान एका चाहतीने असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोशल मीडियावर बॉबीचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबीने आकाशी रंगाची पँट आणि त्यावर जॅकेट घालून दिसत आहे. तसेच त्याने डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. व्हिडीओमध्ये बॉबी केकसमोर उभा राहतो. यावेळी त्याच्या शेजारी लोकांची गर्दी आहे. एवढेच नाही तर लोकांना त्याला मोठा हार देखील घातला आहे.
वाचा: दुसऱ्या दिवशी 'फायटर'च्या कमाईत वाढ, केली कोट्यवधींची कमाई
बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणल्या गेलेल्या केकवर बॉबी देओलचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर त्याचे नावही लिहिण्यात आले होते. शिवाय केकजवळ जात बॉबी पोज देतानाही दिसत आहे. यावेळी चाहते आणि पापाराझी आनंदाने ओरडताना दिसत आहेत. बॉबीपेक्षा त्याचे चाहते जास्त आनंदी दिसत आहेत. बॉबी केक कापत असताना एक महिला तेथे येते आणि बॉबीच्या गालावर किस करते. ते पाहून सर्वजण चकीत होतात. महिलेने किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
बॉबीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर होताच अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘या महिलेला काही कळते की नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने "महिलेने बॉबी देओलच्या इभ्रतीवर हात घातला" असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या