मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fatima Sana Shaikh: ३ वर्षांची असताना लैंगिक शोषण ते कास्टिंग काऊच; फातिमा सना शेख विषयी काही खास गोष्टी

Fatima Sana Shaikh: ३ वर्षांची असताना लैंगिक शोषण ते कास्टिंग काऊच; फातिमा सना शेख विषयी काही खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 11, 2024 07:33 AM IST

Fatima Sana Shaikh Birthday: अभिनेत्री फातिमा सना शेखचे नाव बॉलिवूड अभिनेता आमिर खानशी जोडले जात आहे.

Fatima Sana Shaikh
Fatima Sana Shaikh

बॉलिवूडची दंगल गर्ल म्हणून अभिनेत्री फातिमा सना शेख ओळखली जाते. उत्कृ्ष्ट अभिनय, आरसपाणी सौंदर्य आणि परफेक्ट फॅशन सेन्समुळे ती कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून फातिमाचे नाव आमिर खानशी जोडले जात आहे. इतकच काय तर आमिर आणि किरणचा घटस्फोट तिच्यामुळे झाल्याचा देखील म्हटले जात आहे. आज ११ जानेवारी फातिमाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

११ जानेवारी १९९२ साली फातिमाचा जन्म मुंबईत झाला. ती इथेच लहानाची मोठी झाली. तिने चाची ४२० या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ती वन टू का फोरमध्ये दिसली. त्यानंतर फातिला २००९मध्ये दंगल चित्रपटाची ऑफर आली. तिचा हा चित्रपट तुफान हिट ठरला. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाचा: लेकीच्या संगीत सोहळ्यात आमिर खान, किरण आणि आझादने गायले गाणे Video Viral

फातिमाला लहानपणीच म्हणजे ३ वर्षांची असताना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले होते. तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाब खुलासा केला. ‘मी ३ वर्षांची असतानाच माझा विनयभंग झाला होता. हे कोणत्याही स्त्रिसाठी एका कलंकाप्रमाणे आहे. याविषयी कधीही बोलू शकत नाही. पण आता मला आशा आहे की, काळ बदलला आहे. आधी या विषयी कोणाला सांगू नका किंवा या विषयी काही बोलू नका लोकांचा गैरसमज होईल, असे म्हटले जात होते. मात्र, आता आपल्या देशात आणि जगभरातील लोकांमध्ये लैंगिक शोषणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे’ असे फातिमा म्हणाली.

पुढे तिने कास्टिंग काऊचविषयी सांगितले होते. ‘मला बऱ्याच वेळा ऐकावे लागले की तू कधीही अभिनेत्री होऊ शकणार नाहीस. तू दीपिका पादूकोण किंवा ऐश्वर्या रायसारखी दिसत नाहीस. तू अभिनेत्री कशी बनशील? बरेच लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटते की हे ठीक आहे, हे लोक सौंदर्याकडे एवढे पाहतात की अशी ठरावीक दिसणारी मुलगी अभिनेत्री होऊ शकते. त्या श्रेणीत मी बसत नव्हते. मात्र, आता माझ्याकडे अनेक संधी आहेत. माझ्यासारख्या लोकांसाठीही चित्रपट बनवले जातात, जे सामान्य दिसतात, सुपरमॉडल्ससारखे दिसत नाहीत’ असे फातिमा म्हणाली होती.

WhatsApp channel

विभाग